वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनचा पहिला व्हिडिओ, संपूर्ण ट्रेनचा टूर, दाखवल्या प्रत्येक सुविधा

| Updated on: Oct 16, 2024 | 9:12 AM

vande bharat sleeper train video: व्हिडिओत सुरुवातीला वंदे भारत ट्रेन बाहेरुन दाखवली आहे. त्यानंतर लोको पायलटची कॅबिन कशी आहे, ते दाखवले गेले आहे.लोको पायलटच्या कॅबिनमधून बाहेर पडत स्लीपर कोच दाखवण्यात आला आहे. ट्रेनमधील वॉश रुम, एंट्री एरिया सर्व काही या व्हिडिओत दाखवले आहे.

वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनचा पहिला व्हिडिओ, संपूर्ण ट्रेनचा टूर, दाखवल्या प्रत्येक सुविधा
Vande Bharat
Follow us on

vande bharat sleeper train video: भारतात सर्वात लोकप्रिय ठरलेली वंदे भारत ट्रेन आता स्लीपर कोचमध्ये दिसणार आहे. लवकरच स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन पटरीवर उतरणार आहे. परंतु ही ट्रेन कशी आहे, त्याचे फोटो व्हायरल झाले आहे. मात्र प्रथमच वंदे भारत स्लीपर ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. त्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. या ट्रेनची रचना, इंटेरियल खूपच चांगले आहे. अनेक सुविधा प्रवाशांना या ट्रेनमध्ये दिल्या आहेत. @IndianTechGuide या युजरने X वर हाएक व्हिडियो शेअर केला आहे.

अशी दिसते ट्रेन

व्हिडिओत सुरुवातीला वंदे भारत ट्रेन बाहेरुन दाखवली आहे. त्यानंतर लोको पायलटची कॅबिन कशी आहे, ते दाखवले गेले आहे.लोको पायलटच्या कॅबिनमधून बाहेर पडत स्लीपर कोच दाखवण्यात आला आहे. ट्रेनमधील वॉश रुम, एंट्री एरिया सर्व काही या व्हिडिओत दाखवले आहे. एसी कोच दाखवण्यात आला आहे. कोचमधील प्रत्येक सीट प्लॅस्टिकने पॅक केलेली दिसत आहे. थर्ड एससीमधून बटन पूश करुन सेंकड एसीमध्ये तो व्यक्त जातो. सीटिंग अरेंजमेंट लोकांना खूप पसंत पडत आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

वंदे भारत ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पहिले आहे. हजारो जणांनी त्याला लाईक केले आहे. अनेकांनी त्यावर कमेंट व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की मागील एक दशकात रेल्वेत अनेक चांगले बदल झाले आहे. रेल्वेचे आधुनिकरण झाले आहे. आता बंदे भारतचे स्लीपर कोच चांगले ठेवण्याची जबाबदारी आपली आहे.

आणखी एका युजरने लिहिले आहे, वंदे भारतचा हा स्लीपर कोच असेल तर अद्भूत आहे. आता प्रवाशांवर जबाबदारी आली आहे. ही ट्रेन चांगली ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. काही जणांनी लोक ही ट्रेन चांगली ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण तेज एक्स्प्रेसमधील सीट खराब करणे, सामना चोरुन नेले, असे प्रकार यापूर्वी घडले आहे.

वंदे भारत ट्रेन ही मोदी सरकारचा ड्रिम प्रोजक्ट आहे. मेक इन इंडिया असलेली ही ट्रेन आतापर्यंत फक्त चेअरकारमध्ये धावत आहे. परंतु त्या ट्रेनला मिळालेला प्रतिसाद पाहून तिचा स्लीपर कोच सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.