नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात अनेक मार्गावरुन धावू लागली आहे. या गाडीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ती सुरु करण्याची मागणी केली जात आहे. आता महाराष्ट्रातून चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी मुंबई-गोवा 3 जून रोजी सुरु होत आहे. परंतु देशात ऑगस्ट 2024पर्यंत देशात 75 वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचे उद्दिष्ट मोदी सरकारने ठेवले होते. ते गाठणे अवघड होणार आहे.
काय आहे कारण
सरकारने पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत देशात 75 वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु आतापर्यंत केवळ 18 गाड्या धावल्या आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे कपूरथला येथील रेल्वेचे प्रमुख उत्पादन युनिट असलेल्या रेल कोच फॅक्टरी (आरसीएफ) आहे. 64 गाड्या बनवण्याचे उद्दिष्ट असूनही 2022-23 मध्ये एकही वंदे भारत ट्रेन ही फॅक्टरी देऊ शकली नाही. यामुळे ऑगस्ट 2024पर्यंत देशात 75 वंदे भारत एक्स्प्रेस धावणे अवघड दिसत आहे. आतापर्यंत धावणाऱ्या सर्व वंदे भारत ट्रेन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे बांधण्यात आल्या आहेत.
कोण आहे जबाबदार
आरसीएफने यासाठी पुरवठादारांना जबाबदार धरले आहे. ट्रेनच्या सेटसाठी त्यांनी इलेक्ट्रिकल घटक पुरवठादारांनी दिलेले नाही. RCF च्या अपयशामुळे ऑगस्ट 2024 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर परिणाम होणार आहे.
हे उद्दिष्ट गाठले नाही
कोच कारखाना केवळ वंदे भारत गाड्यांच्या उत्पादनात अपयश आले नाही. तर इतर प्रकारचे डबे बनवण्यातही अपयश झाले आहे. या कारखान्यास 2022-23 आर्थिक वर्षाच्या अखेरीस 1,885 रेल्वे कोच निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यांनी फक्त 1,478 कोच तयार केले. तसेच मार्च 2023 पर्यंत केवळ 153 मेमू गाड्या तयार झाल्या आहे, त्यांना 256 मेमू गाड्यांचे उद्दिष्ट दिले होते.
हे ही वाचा
Vande Bharat : कोकणात वंदे भारत कधी धावणार, तारीख आली, कोकणवासीयांनों लवकरच करता येणार तिकीट बुक