हनी ट्रॅपचे ते धक्कादायक व्हिडिओ कोर्ट बंद रुममध्ये पाहणार, चेंबरमध्ये न्यायाधीश अन् वकीलच असणार

| Updated on: May 19, 2023 | 10:46 AM

Honey Trap : मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आले. हे व्हिडिओ धक्कादायक असल्यामुळे बंद रुममध्ये न्यायाधीश अन् दोन्ही पक्षाचे वकील पाहणार आहे.

हनी ट्रॅपचे ते धक्कादायक व्हिडिओ कोर्ट बंद रुममध्ये पाहणार, चेंबरमध्ये न्यायाधीश अन् वकीलच असणार
honey trap
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशातील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाची सुनावणी सुरु झाली आहे. साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या हनीट्रॅप प्रकरणाची सुनावणी दरम्यान व्हिडिओ आणि सीडी न्यायालयात दाखल करण्यात आली. या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाने व्हिडिओची हार्ड डिस्कसुद्धा सादर केली आहे. सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून व्हिडिओ ओरिजनल असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर हे व्हिडिओ, सीडी अन् हार्ड डिस्क तपास पथकाने न्यायालयात सादर केली. परंतु हे व्हिडिओ धक्कादायक आहे. यामुळे ते कोर्टरुममध्ये न पाहता बंद चेंबरमध्ये पाहण्यात यावे. तसेच त्यावेळी फक्त न्यायाधीश आणि दोन्ही पक्षांचे वकील असतील, अशी मागणी सरकारी पक्षाने केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने ती मान्य केली.

व्हिडिओ बचाव पक्षाला मिळणार नाही

मध्य प्रदेशात काही मुलींना हनी ट्रॅप केले गेले होते. त्यांची फसवणूक करुन व्हिडिओ बनवले होते. हनी ट्रॅपचे हे व्हिडिओ धक्कादायक आहे, यामुळे ते बचाव पक्षालाही देण्यात येणार नाही. एसआयटी प्रमुख एडीजी विपिन माहेश्वरी यांच्या पत्रासह व्हिडिओ भोपाळ येथील न्यायाधीश स्मृता सिंह ठाकूर यांच्या न्यायालयात सादर केले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेली एक युवती यामध्ये आहे आणि तिच्यासोबत ज्या लोकांनी संबंध केले ते आहेत. त्यात काही नेते अन् अधिकारी असल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

कधी झाली होता गुन्हा दाखल

इंदूरमधील हनी ट्रॅप प्रकरणात १७ सप्टेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्या युवतीच्या वडिलांनी भोपाळ पोलिसात तक्रार दिली की माझ्या मुलीला फसवले गेले आहे. भोपाळमधील काही मुलींनी तिची फसवणूक केली, असा दावा त्यांनी केले. या मुलींनी दबाब आणून शारीरिक संबंध बनवण्यास मजबूर केले. यानंतर या प्रकरणी एसआयटी गठीत केली गेली. एसआयटीने मानवी तस्करी प्रकरणातील आरोपी श्वेता विजय जैन आणि आरती दयाल यांच्यावर गुन्हा दाखल केला.

काय आहे व्हिडिओमध्ये

हनी ट्रॅप प्रकरणात मानवी तस्करीशी संबंधित एक केस आहे. त्यात म्हटले आहे की, कॉलेजमधील एका मुलीला श्वेता जैन, आरती दयाल आणि अन्य काही जणांनी फसवून काही जणांकडे पाठवले. त्यांच्यांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे पाचपेक्षा जास्त व्हिडिओ आहे.