Vijay Diwas | 13 दिवसांच्या युद्धानंतर जनरल नियाजीने टेकवलेले गुडघे, पाकिस्तानवरील भारताच्या विजयाची गाथा

| Updated on: Dec 16, 2021 | 9:41 AM

1971 मधील भारत-पाकिस्तान युद्ध हे जागतिक इतिहासात कोरलं गेले आहे. आजच्याच दिवशी पाकिस्तानचा भारताने दारुण पराभव केला होता. 13 दिवसांनंतर पाकिस्तानचा युद्धज्वर थंड झाला. त्याचा भेकड मेजर जनरल अमिर अब्दुल्ला खॉ नियाजी याने मृत्यूच्या भयाने भारतासमोर गुडघे टेकले. या पराजयाने पाकिस्तानची नांगी ठेचल्या गेली तर आपले शेजारी राष्ट्र बांगलादेशची निर्मिती झाली. बांगलादेश या विजयमहोत्सवाची सुवर्ण जयंती साजरी करत आहे. 

Vijay Diwas | 13 दिवसांच्या युद्धानंतर जनरल नियाजीने टेकवलेले गुडघे, पाकिस्तानवरील भारताच्या विजयाची गाथा
Bangladesh Liberation War
Follow us on

मुंबई : पाकिस्तानला चारीमुंड्या चित करुन बांगलादेश स्वतंत्र करण्याचा आजचाच तो सुवर्ण दिवस. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने धुळ चारली होती. या धुळीच्या लोळात पाकिस्तानचे तोंड जागतिक पातळीवर काळे झाले तर बांगलादेशच्या भाळी स्वातंत्र्याची ललाट रेषा उमटली. अर्थातच या विजयाचा शिलेदार भारत होता. बांगलादेशातील गरीब जनतेला पाकिस्तानच्या छळातून भारताने कायमची मुक्ती दिली. हाच तो मुक्तीदिन. याच दिवशी बांगलादेशाने मोकळा श्वास घेतला. आपल्याच बांधवांनी त्यांच्यावर केलेल्या अन्यायाविरोधात ते भारताच्या सहाय्याने उभे ठाकले. भारतीय सैन्याच्या मदतीने त्यांना स्वातंत्र्य मिळाले. पूर्व पाकिस्तान हा त्यांच्या माथी मारलेला शिक्का भारताने पुसून टाकला. बांगलादेश जगात स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. आज भारताचे राष्ट्रपती कोविंद बांगलादेशाच्या या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होत आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचे मोठं शानदार स्वागत केले. त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. काळाच्या पटलावर भारताने स्वतंत्र बांगलादेशाची निर्मितीची रेषा अधोरेखित केली. नव्या पिढीला कदाचित त्याकाळची परिस्थिती आणि बांगलादेश निर्मितीची आवश्यकता याविषयी माहिती नसेल, त्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं 50 वर्षे मागे चाळावी लागतील.

तारीख ही नही हमने तो तकदीर भी बदल दी

ये सिर्फ तारीख नही, इसने तकदीरे और तारीख को ही बदल दिया. तारीख 16  डिसेंबर 1971. हिंदुस्थानच्या विजयाचा आणि पाकिस्तानच्या नांग्या डेचल्याचा मैलाचा दगड. ही नुसती तारीख नव्हती. तर बांगलादेशचं भविष्य पण होतं. ते भारतीयांनी त्यांना बहाल केलं. त्यावर अधिकार गाजवला नाही आणि सांगतिला ही नाही. मात्र पाकिस्तानला जन्माचा धडा शिकविला. पाकिस्तानच्या 93 हजार सैन्यानं भारतीय लष्करासमोर लोटांगण घेतलं. त्यांनी प्राणाची भीक मागितली. शरण येणा-याला मरण नाही, हा सांस्कृतिक संकेत भारतानेही पायदळी तुडविला नाही. बेअब्रु होऊन या सैनिकांनी बांगलादेशातून पळ काढला.

पटकथेची सुरुवात पाकिस्तानने केली, शेवट भारताने रंगविला

भारताच्या या विजयगाथेची आणि पाकिस्तानच्या दारुण पराजयाची पटकथा तेव्हा लिहायला सुरुवात झाली होती. ज्यावेळी पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याच्या वल्गना करायला लागला. त्याच्या बेडूक उड्या, माकडचाळे सीमेवर सुरु झाले. आजही ते सुरुच आहे. 3 डिसेंबर 1971 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या कलकत्यात होत्या. तिथे त्यांचं बैठकांचे सत्र सुरु होते. त्याचवेळी सांयकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी पाकिस्तानंने हल्ला केला. पाकिस्तानने हवाई आक्रमण केले. या युद्धाचं त्यांचं नाव ऑपरेशन चंगेज खान असं होतं. पाकिस्तानी विमानांनी पठानकोट, श्रीनगर, अमृतसर आणि जोधपूर येथील लष्करी तळावर हवाई हल्ले केले. एकाचवेळी 11 एअरबेसवर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. त्यावेळी पाकिस्तानची कमान जनरल याहया खानकडे होती. युद्धाचा बिगुल वाजला होता. समरशंख फुंकण्यात आला. इंदिरा गांधींनी तातडीने आपत्कालीन बैठक बोलविली. त्या दिल्लीकडे रवाना झाल्या. पालम एअरपोर्ट येथे पोहचल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित करुन पाकिस्तानच्या कागळीचा समाचार घेण्याचे ठरवलं. युद्धाला तोंड फुटलं होतं.

पाकिस्तान सेन्याला भारतीय लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिलें. पाकिस्तानच्या एअरबेसवर भारतीय वायुसेनेने हल्ला चढविला. पश्चिमही सरहदसोबत पूर्वी सरहदही भारतासाठी महत्वाची होती. देश दोन्ही बाजुने युद्धाच्या कात्रीत अडकला होता. बांगलादेशात मुक्तीवाहिनीला बळ देणे गरजेचे होते. त्यावेळी भारतीय लष्कराचे सारथ्य जनरल सॅम मानकेशॉ यांच्या हातात होते. त्यांनी पाकिस्तानच्या पराभवाची रुपरेषा तयार केली. ढाकाजवळ भारतीय लष्कराचे जवान होते. ज्याठिकाणी पाकिस्तानी बेस होते. त्याठिकाणी युद्धाला सुरुवात झाली. हा हा म्हणता युद्धज्वर चढला आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. मिसाईल बोटसने पाकिस्तान जहाजांचा बरोबर ठाव घेतला. त्या बेचिराख केल्या. बंगाल खाडीतील पाकिस्तानचा दारुगोळा आणि सैन्याची जमवाजम करण्याचा आणि अमेरिकेच्या मदतीने दबाव आणण्याच्या योजनेवर भारतीय लष्कराने इतक्या शिताफिने पाणी फेरले की पाकिस्तानचे आवसान गळाले. पाकिस्तानला मदतीसाठी धाव घेणा-या अमेरिकेलाही हा मोठा धक्का होता. पाकिस्तानच्या 7 गनबोट्स, एक सबमरीन, दोन डिस्ट्रॉयर, 18 कार्गो आणि इतर दळणवळण सेवा बेचिराख झाल्या.

पाकिस्तानला मोठा झटका

हवाई मार्गे केलेले आक्रमण पाकिस्तानला चांगलेच महागात पडले. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी पाकिस्तानी एअर फोर्सला मोठे भगदाड पडले. भारतीय हवाईदलाने त्यांचे 60 ते 75 लढाऊ विमानांचा चकनाचूर केला. त्यांचे पायलट युद्धबंदी, जायबंदी झाले. तर काहींनी जीव वाचविण्यासाठी मान्यमरच्या जंगलांचा आश्रय घेतला. पाकिस्तानचे डोळे उघडले होते. भारतीय लष्करापुढे आपला निभाव लागले अशक्यप्राय असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनाी जागतिक महासत्ता म्हणून मिरविणा-या अमेरिकेकडे हात पसरवले. तत्कालीन राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी हिंदी महासागरात त्यांची युद्ध सबमरीन युएसएस तैनात केली. पण भारताने तत्कालीन सोव्हिएत संघासोबत केलेल्या करारामुळे सोव्हिएत संघाने तत्काळी हिंदी महासागरात भारताच्या बाजुने व्लाडीवोस्टक ने क्रुजर आणि डिस्ट्रॉयर वॉरशिप्स पाठविल्या. या अजस्त्र युद्धनौकांनी हिंदी महासागरही भयभयीत झाला. अमेरिकेला चेकमेट भेटला. त्यामुळे पाकिस्तानला हात चोळत बसावे लागले. भारतीय लष्कर जनरल मानेकशॉ यांनी पाकिस्तानला शरण येण्यासाठी संदेश पाठविला. युद्धस्थितीचे आणि पाकिस्तानच्या पराभवाची पूर्णतः त्यांना कल्पना देण्यात आली. 9 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला.

16 डिसेंबर रोजी पाकिस्तानचे सपशेल लोटांगण

सरेंडर कॉलवर विचार करायला पाकिस्तानने काहीतरी चमत्कार होईल या आशेवर एक आठवडा घालवला. त्याने भारताने निर्णायक मारा सुरु केला. पाकिस्तानकडून पूर्व पाकिस्तानात (सध्याचा बांगलादेश) मदत मिळण्याची आशा पार धूसर झाली होती. पूर्व ची धुरा सांभाळणारा जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी याचा जीव वर खाली सुरु होता. आता आपली काही धडगत नाही, सैन्यासह आपण ही वाचू की नाही या चिंतेत त्याला रात्रभर झोप लागत नव्हती. मरणाच्या भीतीपोटी नियाजीने 15 डिसेंबर 1971 रोजी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. 16 डिसेंबर 1971 रोजी भारतीय जनरल जैकब यांनी जनरल नियाजी याला आत्मसमर्पणाच्या अटीव शर्ती वाचून दाखविल्या. त्याला अर्ध्या तासांचा अवधी देण्यात आला. बाजी पलटल्याचे लक्षात येताच नियाजीने गुडघे टेकविले. त्याने सरेंडर प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषणा केली की, ढाका ही स्वतंत्र देशाची स्वतंत्र राजधानी आहे. या देशाला बांगलादेश म्हणून ओळख मिळाली.

संबंधित बातम्या :

आजच्याच दिवशी जेव्हा भारतानं जगाचा नकाशा बदलला, राष्ट्रपती ढाक्यात, पंतप्रधान वॉर मेमोरीयलवर जाणार