नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : सुशानस आणि विकास हे दोन्ही शबद् सरकारी शब्द बनू नये. सुशासन हे जन आंदोलन व्हावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत. सुशासन काय आहे हे तळागाळापर्यंत समजलं पाहिजे. त्याचा अर्थही लोकांना कळला पाहिजे, त्यासाठीच या सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. सुशासन महोत्सवाला ते संबोधित करत होते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या सुशासन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी विनय सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी सुशासन महोत्सव का? त्याची गरज काय? याची माहिती दिली.
सुशासन आणि विकास हे फक्त सरकारी शब्द बनू नये. तर ते जन आंदोलन व्हावे. असं मोदीही म्हणतात. शासनात बसलेल्या लोकांचे हेतू आणि कुशलतेची लोकांना जाणीव व्हावी तरच विकास होईल. त्या हेतूनचे आम्ही का कार्यक्रम आयोजित केला आहे. सुशासनाची कशी अंमलबजावणी केली जात आहे, हे आज आपण पाहणार आहोत. मोदींच्या नेतृत्वात सुशासन पर्व सुरू आहे. क्रियान्वयाद्वारे लोकांपर्यंत सुशासनचा हेतू पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं.
तळागाळापर्यंत सुशासन कसं पोहोवलं याची माहिती विविध मान्यवर देणार आहेत. जेपी नड्डा हे यशस्वी आरोग्य मंत्री होते. हिमाचल प्रदेशात पर्यावरण मंत्री असताना त्यांनी हिमाचल प्रदेशाला कार्बन क्रेडिट देण्याचं काम त्यांनी केलं. त्यावर अभ्यासही करण्यात आला होता. शिमला शहरातील रस्ते प्लास्टिकने तयार केले. त्यांनी प्लास्टिक मुक्त शहर करण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे जेपी नड्डा यांना पाचारण करण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे यशस्वी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना शासन आणि प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळेच त्यांना आम्ही या ठिकाणी पाचारण केलं आहे. त्यांचा अनुभव सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.