कानपूर – राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा कार्यक्रम ५० किलोमीटरवर सुरु असताना कानपुरात झालेल्या हिंसाचारामागील (Kanpur Violence)खरे वास्तव आता तपासात समोर येते आहे. हा हिसांचार ही तत्कालीक घटना नव्हती. तर यामागे मोठा कट होता, हे धक्कादायक वास्तव आता समोर येते आहे. या प्रकरणाचा अटकेत असेलल्या मास्टरमाईंड जफर हयात हशमी याच्या व्हॉट्सअप चॅटमधून याचे पुरावे मिळाले आहेत. मास्टरमाईंड जफरने केवळ दिखाव्यासाठी कानपूर बंद मागे घेतल्याचे आवाहन केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हे खोटे आवाहन करण्यात आले होते, हेही स्पष्ट झाले आहे. हयातच्या व्हॉट्सअप चॅटमधून हिंसाचार झाला त्यादिवशीचे काही फोटो आणि व्हिडिओ हाती आले आहेत, त्यात जमावाला शांत करण्याऐवजी भडकवण्याचे काम हयात करत होता, असे दिसते आहे. व्हीव्हीआयपी व्यक्ती कानपूर परिसरात ३ जूनला असल्याने, तोच दिवस निवडण्यात आसमोर आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात मास्टरमाईंड हयात जफर, त्याचे साथीदार जावेद, सुफियान आणि राहिल य़ांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. सगळ्यांचे जबाब वेगवेगळे होते, मात्र त्यातील काही बाबी मात्र समान होत्या. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा भविष्यात असे कुणी करु नये, यासाठीच राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाचा दिवस हिंसाचारासाठी निवडण्यात आल्याचे या सगळ्यांनी मान्य केले आहे. या हिसांचारानंतर आपला उद्देश साध्य झाल्याचेही या आरोपींनी सांगितले आहे. देशाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत आमची मागणी पोहचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाजार बंद करण्याची योजना केवळ कानपुरातच नव्हे तर सगळीकडे व्हावी, ही योजना होती, असेही या आरोपींनी सांगितले आहे.
हयात याच्या मोबाहईलमध्ये १४१ व्हॉट्सअप ग्रुप मिळाले आहेत. हिंसाचार झाला त्या दिवशी हयात १४ ग्रुपवर अधिक सक्रिय होता. यातील सर्वाधिक चॅटिंग आणि अपडेट हे एमएमए जौहर फॅन्स एसोसिएशन कानपूर या ग्रुपमध्ये करण्यात आले. हजार बाजार बंद करणाऱ्यांचा धीर वाढवत होता. त्यानंतर बाजार बंद झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ अपडेट होण्यास सुरुवात झाली.
या ग्रुपमध्ये हयातची पत्नीही जास्त सक्रिय होती. तीही दुकान बंद ते हिंसाचार हे सगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करीत होती. तिने काही मेसेजेसही टाकले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हयातची पत्नीच या ग्रुपची एडमिन असल्याचेही समोर आले आहे. पोलीस आता एकेका मेसजची चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर या ग्रुप्समध्ये कोण-कोण आहेत, याचाही तपास करण्यात येत आहे.
हिंसाचाराच्या दिवशी हयातचे शहरातील काही मान्यवरांशी बोलणे झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याच्या मोबाईल नंबरच्या सीडीआरमध्ये हे समोर आले आहे. त्यामुळे या व्यक्तींचाही यात सहभाग असल्याचा संशय वाढला आहे. ही मंडळी समोर आली नसली तरी त्यांनी या सगळ्या हिंसाचाराला मदत केल्याचा संशय आहे. आता याही सगळ्यांना अटक करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.