एका बाइकवर 8 जण… सोबत रजाई, गादी अन्…दृश्य पाहून पोलीस हैरान, पाहा व्हिडिओ

| Updated on: Nov 16, 2024 | 10:02 AM

Viral Video: शाहजहापूरमधील या व्हिडिओत गाडीवर सहा मुले आणि पत्नीसोबत जाणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी रोखले. त्यावेळी त्यांच्या घरातील सामना गाडीवर बांधलेले दिसले. त्यानंतर गाडीवर किती जण बसले आहे, त्याची मोजणी तो पोलीस करतो.

एका बाइकवर 8 जण... सोबत रजाई, गादी अन्...दृश्य पाहून पोलीस हैरान, पाहा व्हिडिओ
Viral Video
Follow us on

Shahjahanpur Viral Video: रस्त्यावर गाडी चालणारे काही जण वाहतुकीचे नियम मोडत असतात. मग पोलिसांनी पकडल्यावर आपली ओळख दाखवून सुटण्याचा प्रयत्न करतात. परंतु एखाद्या बाईकवर किती जण प्रवास करु शकतात, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सहजपणे तीन, चार असे उत्तर देणार. परंतु एका बाईकवर तीन, चार नाही तर आठ जण प्रवास करत आहे. सोबत गादी, राजाई, बालटी आहे. पोलिसांनी या परिवारास थांबवले. लोकांची मोजणी केल्यावर पोलीस हैरान झाले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथील हा व्हिडिओ आहे.

शाहजहापूरमध्ये आठ लोकांचा एक परिवार फिरण्यासाठी निघाला. परिवारात आठ जण होते. त्यांच्याकडे कार नसल्याने चक्क बाईकवर आठ जणांना बसवले. या गाडीत व्यक्ती, त्याची पत्नी आणि मुले तसेच घरचे सामान आहे. बाईक पती चालवत होता. त्याच्या मागे त्याची पत्नी बसली. त्या व्यक्तीच्या पुढे तीन मुले बसली. त्यानंतर मागेही तीन मुले बसली. आपला संपूर्ण परिवार आणि घरातील सामान घेऊन मोठ्या ऐटीत तो व्यक्ती निघाला.

पोलिसाने रोखले अन्…

शाहजहापूरमधील या व्हिडिओत गाडीवर सहा मुले आणि पत्नीसोबत जाणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी रोखले. त्यावेळी त्यांच्या घरातील सामना गाडीवर बांधलेले दिसले. त्यानंतर गाडीवर किती जण बसले आहे, त्याची मोजणी तो पोलीस करतो. त्यावेळी पती आणि पत्नी स्मित हास्य करत आहे. वाहतूक पोलिसाने त्याला वाहतूक नियामांचे उजळणी करत जाऊ दिले. तसेच पुन्हा असे करु नको, असे बजावले. दरम्यान, या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.

सरकार जनतेच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियम बनवते. त्यामुळे ट्रिपल सीट रायडिंग करणाऱ्यांनाही दंड ठोकला जातो. तसेच अनेक शहरांमध्ये विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांनाही दंड केला जातो. सरकारने ही नियामवाली पैसे कमवण्यासाठी नाही तर लोकांच्या सुरक्षेसाठी केली आहे. वाहतुकीचे नियम मोडणे हे नागरिकांसाठीच घातक ठरते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो.