कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) यांची आज जंयती, विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील (Marathi language) अग्रगण्य कवी (Poet),लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस अर्थात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी सलग चार दशकांपेक्षा अधिक काळ लिखान केले. ते एक श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक होते. त्यांच्या कवीता या तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.
कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. कुसुमाग्रज यांना त्यांच्या नटसम्राट या साहित्यकृतीबद्दल मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.
कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. जेव्हा काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा कवीला मीपण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते, हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. कुसुमाग्रजांनी सलग चार दशकांपेक्षा अधिक लेखन केले. ते कवी, नाटककार, कथाकार, कादांबरीकार, लघुनिबंधकार होते. मात्र समाजाला त्यांच्यातील कवीच अधिक भावला. अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवन लहरी, थांब सहेली, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष असे अनेक कवितासंग्रह त्यांनी लिहीले. कुसुमाग्रज यांचे 10 मार्च 1999 रोजी निधन झाले. निधनानंतर वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’नावाची संस्था उभारण्यात आली.
राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढणार? बच्चूभाऊ विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश!