नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी एक सनसनाटी दावा केला आहे. ममता बॅनर्जी यांनी चार वर्षापूर्वी त्यांच्या सरकारला पेगासस (Pegasus) खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. तर, 25 कोटी रुपयांमध्ये पश्चिम बंगाल सरकारला पेगासस विकत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, आम्ही नागरिकांच्या गोपनीयतेचा सन्मान करत असल्यानं तो प्रस्ताव नाकारला होता, असं बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारनं पेगाससच्या माध्मयातून पत्रकार, नेते, पोलीस अधिकारी यांचे फोन कॉल रेकॉर्ड केले होते. ही संघटित गुन्हेगारी असल्याची टीका ममता बॅनर्जींनी केली आहे.
They (NSO Group, Israeli cyber intelligence company) had come to our police dept 4-5yrs ago to sell their machine (Pegasus spyware) & demanded Rs 25cr; I turned it down as it could have been used politically, against judges/officials, which is not acceptable:WB CM Mamata Banerjee pic.twitter.com/WTnAq8MWyh
— ANI (@ANI) March 17, 2022
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विट केलं आहे. ते(एनएसओ ग्रुप, इस्त्राईलची सायबर इंटेलिजन्स कंपनी) चार पाच वर्षांपूर्वी आमच्या पोलीस विभागाकडे पेगासस विकण्यासाठी आले होते. त्यांनी त्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती.मात्र, आम्ही तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. पेगाससचा वापर राजकीय नेते, न्यायमूर्ती आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात वापरला जाऊ शकला असता, ते योग्य नव्हतं, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी पेगाससवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांनी पेगाससचा लाभ घेतला होता. सध्याच्या केंद्र सरकारकडून नेते, न्यायमूर्ती, अधिकारी, पत्रकार, नोकरशाही आणि समाजसेवक यांची हेरगिरी करण्यात आल्याची टीका बॅनर्जी यांनी केली. तर, पेगाससच्या माध्यमातून कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणायची इच्छा नव्हती. पेगाससच्या द्वारे माझी देखील हेरगिरी होतीय, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
इतर बातम्या:
IPL 2022: ‘माझी परिस्थिती माहित नसताना तुम्ही…’ Prithvi Shaw चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर