कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरच्या या जोडप्याने गोव्यात धुमधडाक्यात विवाह केला. एका अलिशान रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. लग्नासाठी पाहुण्यांना विमानाने गोव्याला नेण्यात आले. लग्न व्यवस्थित पार पडले. त्यानंतर लग्नाच्या रात्री असे काही घडले ज्यामुळे दोन्ही कुटुंबात राडा झाला. लग्नाच्या रात्री वधूने असे काय सांगितले की, दोन्ही कुटुंबात वाद झाला. लग्नाच्या रात्री नवरीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला. तिने म्हटले की, घरच्यांच्या दबावाखाली तिने हा विवाह केला. हे ऐकून पतीला जोराचा झटका बसला.
लग्नाच्या रात्री तिने सांगितले की तिचे दुसरे कोणावर तरी प्रेम आहे. मी दुसऱ्याची आहे. यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आणि त्यानंतर ते न्यायालयात जावून पोहोचलंय.
कानपूरमधील दोन मोठ्या उद्योगपतींच्या कुटुंबांमध्ये नातं जोडले जाणार होते. 26 नोव्हेंबर 2021 रोजी हा विवाह पार पडला. सगळं काही सुरळीत होते. गोव्यात एका व्हीआयपी रिसॉर्टमध्ये लग्न पार पडले. पण नंतर या लग्नाची संपूर्ण शहरात चर्चा रंगली.
नवरदेवाने सांगितले की, नवरीचा प्रियकर तिच्या सासरच्या घरी जाऊ लागला. प्रियकराच्या येण्या-जाण्याचे सीसीटीव्ही फुटेज नवरदेवाला मिळाले. यानंतर पती-पत्नीमधील वाद वाढला. कुटुंबात कलह निर्माण झाला आणि दोघांमध्ये रोज हाणामारी होऊ लागली.
बदनामीच्या भीतीने नवरदेवाने कोणालाही काही सांगितले नाही. वधूने लग्नाच्या रात्री संबंध ठेवण्यास नकार दिला होता आणि पत्नी म्हणून राहण्यास नकार दिला होता. पण याला विरोध केला असता तिने आत्महत्येची धमकी देण्यास सुरुवात केली. वधूने तिचा मामा आणि कुटुंबीयांना घरी बोलावले. त्यांना मारहाण करून घरात ठेवलेले दागिनेही काढून घेतले. वधूचे मामा शहरातील मोठे व्यापारी आहेत. पोलीस खात्यात त्यांची चांगली पकड आहे. असा आरोप ही नवरदेवाने केला आहे.
नवरदेवाने पोलिसात तक्रार दाखल केली पण कोणतीही कारवाई झाली नाही. सीसीटीव्हीसह सर्व पुरावे गायब केल्याचा आरोप आहे. बनावट विधान करून अंतिम अहवाल सादर करून प्रकरण बंद करण्यात आले. असा आरोप नवरदेवाने केला. त्यानंतर नवरदेवाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. डीसीपींकडे तपास सोपवण्यात आला.
वधूने पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन हायप्रोफाईल कुटुंबांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू आहे.