पंतप्रधानांनी ज्याचा उल्लेख केला ते कच्चातिवू बेट नेमके कसे आहे ? भारतीयांना तेथे प्रवेश आहे का?

| Updated on: Aug 13, 2023 | 4:13 PM

आपल्या शेजारी देश श्रीलंका तेथील अनेक सुंदर बेटांमुळे ओळखला जातो. या बेटांपैकी एक कच्चातिवू बेट आहे.

पंतप्रधानांनी ज्याचा उल्लेख केला ते कच्चातिवू बेट नेमके कसे आहे ? भारतीयांना तेथे प्रवेश आहे का?
katchateevu
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : मणिपूर प्रश्नावर घेरणाऱ्या विरोधकांना शांत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट रोजी संसदेत अविश्वास ठरावाला उत्तर देताना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला कच्चातिवू बेट आंदण म्हणून का दिले ? असा जोरदार प्रतिहल्ला केला होता. तेव्हा कच्चातिवू बेट म्हणजे काय आहे? या अनेकांच्या मनात सवाल निर्माण झाले असतील तर पाहूया काय आहे हे बेट आणि या विषयाची पार्श्वभूमी..

कच्चातिवू भारत आणि श्रीलंके दरम्यानचे छोटे बेट आहे. साल 1947 मध्ये झालेल्या करारानूसार ते श्रीलंकेच्या ताब्यात आहे. 1974-77 भारत आणि श्रीलंका समुद्री सीमा सामंजस्य करारानूसार शेजारी देश श्रीलंकेला ते मिळाले. श्रीलंकेचे राष्ट्रपती सोबत करार करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते त्यांना दिले. आपल्या शेजारी देश श्रीलंका तेथील अनेक सुंदर बेटांमुळे ओळखला जातो. या बेटांपैकी एक कच्चातिवू बेट आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी कच्चातिवू बेट भारताने श्रीलंकेकडून परत घ्यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

किती आकार आहे

या कच्चातिवू बेटाचा आकार 285 एकर इतका आहे. एक किलोमीटरच्या परीघात त्याचा विस्तार असावा. तीस मिनिटात त्याची संपूर्ण पाहणी करता येते. चारी बाजूंनी निळाशार समुद्र आणि मोकळी हवा यामुळे हे बेट खुपच सुंदर आहे. असे म्हटले जाते की चर्च पहायला येणाऱ्यांना श्रीलंकेचे अधिकारी मोफत ब्रेकफास्ट आणि लंच तसेच डीनर देतात.

भारतीय नागरिक फिरायला जावू शकतात

तामिळनाडूसह भारतातील अनेक नागरिक तेथील चर्च पाहायाला तेथे आजही जातात. तेथे जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हीसाची गरज नाही. परंतू तेथे प्रवास करणे सोपे नाही. संपूर्ण वर्षात येथे केवळ 2000 भारतीय आणि 4000 श्रीलंकन पर्यटकांना प्रवेश मिळतो. वर्षातून एकदा येथे चर्च एंटोनी फेस्टीव्हल आयोजित होतो. धार्मिक कारणामुळे प्रवेश मिळतो. दक्षिण भारतातील रामेश्वरम या सुंदर ठीकाणाहून बोटीने येथे जाता येते. या बोटीत एका वेळी 30 ते 35 लोक बसू शकतात.