WITT 2024 : अमेरिकेच्या राष्ट्रपतीप्रमाणेच पंतप्रधान मोदी वर्ल्ड लीडर; ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचं सर्वात मोठं विधान

| Updated on: Feb 26, 2024 | 12:46 PM

टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर भाष्य करतानाच भारताने साधलेला विकास, भारताची अर्थव्यवस्था आणि चीन आणि रशियाच्या विस्तारवादी भूमिकेवरही भाष्य केलं. चीन नेहमीच शेजारील देशांना त्रास देत आला आहे. चीनला कोणतंही युद्ध लढायचं नाहीये, पण युद्ध जिंकायचं आहे. जगासाठी हे संकेत काही बरे नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

WITT 2024 : अमेरिकेच्या राष्ट्रपतीप्रमाणेच पंतप्रधान मोदी वर्ल्ड लीडर; ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचं सर्वात मोठं विधान
Tony Abbott
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. मोदींच्या काळात भारत जगतील दोन लोकशाही सुपर पॉवरपैकी एक म्हणून उदयास आला आहे. जेव्हाही स्वतंत्र व्यक्तीमत्त्व असलेल्या नेत्याची जेव्हाही चर्चा केली जाईल तेव्हा पंतप्रधा नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं जाईल. अमेरिकेच्या राष्ट्रपतीप्रमाणेच मोदी वर्ल्ड लीडर म्हणून ओळखले जातील, असं टोनी अबॉल्ट यांनी म्हटलं आहे.

टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. भारताने आक्रमकता दाखवली नाही. शांततेने जगातील वाद सोडवले आहेत. क्वाडला सशक्त करण्यात मोदींची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. क्वाड, नाटोनंतर दुसरी मजबूत संस्था आहे, असं टोनी अबॉट यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंदो आबे यांचंही स्मरण केलं. क्वाडच्या सशक्तीकरणासाठी मोदी यांच्याप्रमाणे शिंजो आबे यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे, असंही अबॉट यांनी सांगितलं.

टोनी अबॉट यांनी यावेळी भारताच्या विकासकामावरही भाष्य केलं. भारतात स्वच्छ पाणी, वीज आणि सॅनिटेशन 80 ते 97 टक्के लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. भलेही सामान्य गोष्टी असतील पण जिओ पॉलिटिक्समध्ये या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भारताच्या डिजीटल क्रांती, मेट्रोचा विकास आणि अंतराळातील भारताच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. भारताची न्यायपालिका आणि मीडियाच्या स्वातंत्र्यावरही त्यांनी भाष्य केलं.

मोदी सच्चे देशभक्त

मोदींना हिंदू नेता म्हणून संबोधलं जातं. पण ते एक सच्चे देशभक्त आहेत. मोदी भारताला सशक्त बनवत आहेत. मोदींच्या नेतृत्वाची संपूर्ण जगात स्तुती होते. ते सामान्य नेता नाही. भारत मोठ्या संधीची शक्यता आहे. विकसीत देश असूनही भारत नवनवीन यशाची शिखरे गाठत आहे, असंही त्यांनी सांगितलं. टोनी अबॉट यांनी तब्बल 12 मिनिटे संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर भाष्य करतानाच भारताने साधलेला विकास, भारताची अर्थव्यवस्था आणि चीन आणि रशियाच्या विस्तारवादी भूमिकेवरही भाष्य केलं. चीन नेहमीच शेजारील देशांना त्रास देत आला आहे. चीनला कोणतंही युद्ध लढायचं नाहीये, पण युद्ध जिंकायचं आहे. जगासाठी हे संकेत काही बरे नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.