मुंबई | 29 जुलै 2023 : लांबपल्ल्याचा रेल्वे प्रवास करताना अनेकदा RAC तिकीटाचा उल्लेख तुम्ही ऐकला असेल. पॅसेंजर ट्रेनमध्ये जर प्रवास असेल तर स्लीपर क्लास ते सेकेंड क्लास एसी पर्यंत आपल्या RAC तिकीट दिसते. एका कम्पार्टमेंटमध्ये सहा मुख्य सीट नंतर डब्याच्या मधल्या गल्लीच्या दुसऱ्या कडेला दोन सिट असतात ज्यांना एक फूल किंवा दोन हाफ सीटमध्ये बदलता येते. आरएसी म्हणून ही खिडक्या शेजारील अर्धवट आसने दिली जातात. प्रवासी आरएसी सिटचा उल्लेख खूप जण करताना परंतू अनेकांना त्याचा खरा अर्थ माहीती नसतो. तर आपण पाहूया काय आहे ‘आरएसी’ तिकीटाचा अर्थ काय ते ?
आरएसीचा फूल फॉर्म रिझर्व्हेशन अगेस्ट कॅन्सलेशन असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा एखादा प्रवासी आरक्षित तिकीट प्रवासी रद्द करतात तेव्हा ज्या प्रवाशांकडे ‘आरएसी’ वेटींग तिकीट असते ते लगेच ‘कन्फर्म’ होते. त्यामुळे प्रवाशांना पूर्ण बर्थ अलॉट होऊन प्रवासी आरामात झोपून प्रवास करु शकतो. यालाच आरएसी तिकीट कन्फर्म झाले म्हणतात. म्हणजे एखादी तिकीट रद्द झाली आहे तिच्या बदल्यात तुम्हाला ‘कन्फर्म’ तिकीट दिली जाते. RAC ही एक प्रकारची वेटींग तिकीटच असते. परंतू त्यास सामान्य वेटींग तिकीटा पेक्षा चांगले तिकीट मानले जाते.
RAC तिकीटात तुम्हाला केवळ बसायची सोय होण्यापूरती सिट मिळते. त्यावर तुम्ही झोपू शकत नाही. मग रेल्वे आरएसी तिकीटाचे पूर्ण पैसे का आकारते ? रेल्वेने आरएसी तिकीटाच्या माध्यमातून तुम्हाला प्रवासात कोणी तिकीट रद्द केली तर पूर्ण बर्थ मिळण्याची गॅरंटी असते. जर समजा अर्धे पैसे घेतले आणि प्रवासात पूर्ण बर्थ मिळाली तर पैसे नंतर वसुल करण्याची कोणतीही यंत्रणा सध्या रेल्वेकडे नाही. अशाप्रकारे ज्या वेटींग तिकीटात बसण्यापुरत्या आसनाचेही आरक्षण नसते त्या ‘वेटींग तिकीटा’चे देखील रेल्वे पूर्ण पैसे आकारते. RAC तिकीटात किमान बसण्याचे आसन तरी हमखास राखीव असते त्यामुळे RAC मिळाली तरी प्रवाशांना आनंद होतो. ते आनंदाने संपूर्ण पैसे भरायला तयार असतात.