लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देणाऱ्याची दीड कोटीत सुपारी, सलमाननंतर आता करणी सेना प्रमुख निशाण्यावर

| Updated on: Oct 26, 2024 | 12:27 PM

lawrence-bishnoi: सुखदेव गागामेडी हत्येमुळे लॉरेन्स बिश्नाई गँगच्या सर्व सदस्यांचे एनकाउंटर करण्याची मागणी करणी सेनेकडून केली जात आहे. यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या हत्येची सुपारी दिली जात आहे.

लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देणाऱ्याची दीड कोटीत सुपारी, सलमाननंतर आता करणी सेना प्रमुख निशाण्यावर
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर कारागृहात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे. लॉरेन्स बिश्नोई याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये देण्याची घोषणा क्षत्रिय करणी सेना प्रमुख राज शेखावत यांनी केली. त्यांच्या या घोषणेची चर्चा सुरु असताना आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नाई गँगने त्यांच्या नावाची सुपारी दीड कोटी रुपयांमध्ये दिली आहे, असा दावा केला जात आहेय. बिश्नाई गँगने बिहारमध्ये ही सुपारी दिली आहे. स्वत: राज शेखावत यांनी ही माहिती दिली. म्हणजेच सलमान खाननंतर राज शेखावत आता बिश्नाई गँगच्या निशाण्यावर आहे.

काय म्हणाले होते राज शेखावत

राज शेखावत यांनी घोषणा केली होती की, कोणताही पोलीस कर्मचारी लॉरेन्स बिश्नोई गँगचे एनकाउंटर करत असेल तर त्यांची संघटना त्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये देईल. तसेच क्षत्रिय करणी सेना त्या पोलीस कर्मचारी आणि त्याचा परिवाराकडे संपूर्ण लक्ष देणार आहे. क्षत्रिय करणी सेनेचे कोट्यवधी सदस्य आहेत. त्या लोकांनी पाच-पाच पैसे दिले तरी एक कोटी रक्कम सहज जमा होईल, असे शेखावत यांनी म्हटले होते.

…त्यानंतर सुरु झाल्या धमक्या

एका मुलाखतीत राज शेखावत यांनी म्हटले होते की, मी लॉरेन्स बिश्नाई गँगचा विरोध करु लागताच मला धमक्या मिळू लागल्या आहेत. लॉरेन्स गँगचे सदस्य मला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. त्या लोकांनी माझी सुपारी दीड कोटी रुपयांमध्ये दिल्याची मला माहिती मिळाली आहे. बिहारमधील सिवान येथील ओसामा खान याला ही सुपारी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

देशभरात करणी सेनेचे कोट्यवधी सदस्य

राज शेखावत यांनी म्हटले की, धमक्या मिळत असल्यानंतरही मी आपल्या वक्तव्यावर कायम आहे. मला कोणतीही भीती वाटत नाही. जन्म अन् मृत्यू देणे हे ईश्वाराच्या हातात आहे. ज्या व्यक्तीला मला मारण्यासाठी पाठवला होता, तो माझा समर्थक निघाला. त्याने येऊन मला ही सर्व माहिती दिली. सुखदेव गागामेडी हत्येमुळे लॉरेन्स बिश्नाई गँगच्या सर्व सदस्यांचे एनकाउंटर करण्याची मागणी करणी सेनेकडून केली जात आहे. लॉरेन्श बिश्नाईकडे शूटर आहे? यावर राज शेखावत म्हणाले, करणी सेनेपेक्षा मोठी सेना देशात कुठेच नाही. माझ्याकडे कोट्यवधी करणी सैनिक आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही.