मुंबई : भारत देश स्वातंत्र्याच्या (75 Years of Independence) अमृत महोत्सवी वर्षात पदार्पन करताना (Security) सुरक्षतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. संरक्षण स्थिती ही देशाची मजबूत झाली आहे. देशाला स्वातंत्र्य हेऊन 75 वर्ष होत असली तरी गेल्या वीस वर्षामध्ये भारत देशाने स्वत:ला सक्षम बनवण्यास सुरवात केली होती. यामध्ये काळाच्या ओघात विविध बदल झाले असले तरी 2001 साली ज्या विमानाची निर्मिती झाली ती देशाच्या दृष्टीने महत्वाची राहिलेली आहे. कारण याच वर्षी (Tejas aircraft) तेजस या पहिल्या स्वदेशी सुपर सॉनिक फायटर विमानाने उड्डाण केले. याची निर्मिती हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने याची निर्मिती केली होती. यामध्ये अशी वैशिष्ट्ये आहेत जी कोणत्याही लढाऊ विमानाला उच्च दर्जाची बनवू शकतात. याच विमानाने नंतर पुन्हा रिटायर मिग-21 याची जागा घेतली. तेजस विमानाचे काय होते महत्व आणि त्याचे योगदान याची माहिती असणे गरजेचे आहे.
तेजस हे लढाऊ विमान असले तरी तेवढेच धोकादायकही होते. वजनाने हलके पण त्याचा प्रचंड वेग आणि क्षमता हे त्याचे वैशिष्ट्ये होते. देशात तयार होणाऱ्या विमानापैकी तेजस हे जगातील धोकादायक लढाऊ विमान होते. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावरून तेजसचे नाव ठेवण्यात आले होते. अखेर हवाई दलातून निवृत्त झालेल्या मिग-21 या विमानाची जागा याच विमानानं घेतली आहे. या तेजस विमानाला डेल्टा बँक आर्किटेक्चर आहे. तसेच याची डिझाईन मानवी मशीन इंटरफेस प्रमाणे करण्यात आली आहे. याचे प्रत्यक्षात उत्पादनाचे कार्य हे 2007 साली सुरु झाले तर हवेतून मारा करण्यास हे सक्षम होते. विमानांना वाहनांमधूनही उड्डाण करता यावे म्हणून नौदलासाठी ते तयार करण्यात आले.
तेजस हे लढाऊ विमानाचे महत्व हे आपल्या वेगळेपणामुळे टिकून राहिले होते. ते एलसीए तेजस स्वदेशी 4.5 जनरेशनचे विमान होते. शिवाय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने हे विकसित केले आहे.एलसीए तेजस, दसॉल्ट राफेल, सुखोई थुर्ती, एमकेआय डसॉल्ट, मिराज मिग-२१ बायसन या प्रमुख लढाऊ विमानांसह भारतीय हवाई दलाचा भाग बनला आहे. आकाशात झेपावताना डोळ्याचे पारणे फिटेल अशी त्याची उडाण राहिलेली आहे. हे सिंगल-सीटर पायलट विमान आहे, याचे ट्रेनर व्हेरिएंट 2-सीटर आहे.
पंतप्रधान पदी अटल बिहारी वाजपेयी असताना हे विमान तयार झाले होते. शिवाय याच काळात मिग-21 या लढाऊ विमानाच्या जागी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्राम सुरू करण्यात आला. 2003 साली पंतप्रधान वाजपेयी यांनी हे नामकरण केले. तेजस एलसीए हे 4.5 जनरेशनचे विमान आहे. आज या विमानाला आशिया खंडातील अनेक देशांमध्ये मोठी मागणी आहे.
तेजस ताशी 2 हजार 376 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतो, तो 45.4 फूट उंच, 14.9 फूट उंच आहे, त्याचे एकूण वजन 13 हजार 500 किलो ग्रॅम आहे. 50 हजार फुटांपर्यंत उंचीवर उडू शकते, विशेष म्हणजे अवघ्या 460 मीटरच्या धावपट्टीवरूनही नॉकऑफ करता येते. हे एक सुपर सॉनिक फायटर जेट असून, ते सर्वात धोकादायक ब्राह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकते. अशा वैशिष्ट्यपूर्ण विमानाचे सुरक्षेत्या दृष्टीने मोठे योगदान आहे.