मुंबई : केरळातून तळकोकणात वेगाने दाखल झालेल्या (Monsoon) मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला आहे. असे असले तरी आतापर्यंत (Maharashtra) निम्मा महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला आहे. कोकणानंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ज्या वेगाने पावसाला सुरुवात झाली असली तरी पश्चिम महाराष्ट्राती काही जिल्हे व (Marathwada) मराठवाड्यातील परभणी आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे. शिवाय आज (मंगळवार) मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि देवळा तालुक्यात सोमवारी रात्री हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे आता खरिपाची लगबग या भागात पाहवयास मिळत आहे.
यंदा वेळेपूर्वी दाखल होणार मान्सून तब्बल 10 जून रोजी बरसला. 10 जून तळकोकणात मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली. 11 जून रोजी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भागात दाखल झालेला मान्सून सोमवारी मात्र मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील परभणीपर्यंत हजेरी लावली आहे. आता मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उर्वरीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही लवकरच व्यापला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
14 Jun,
गेल्या 24 तासांत, राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या मध्यम ते तीव्र सरी पडल्या; नाशिक, नागपूर, औरंगाबाद, परभणी, मालेगाव, नंदुरबार, रत्नागीरी, सिंधूदुर्ग मध्ये काही ठिकाणी.— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 14, 2022
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळेच चोहीकडे पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले आहे. मुसळधारेने सर्वच घटकांची व प्रामुख्याने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. झोपडपट्टीवासीयांची घरात शिरलेले पाणी काढताना दमछाक झाली. शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले होते. बसस्थानक परिसरातील गटार ओसंडून वाहत बसस्थानक असल्याने आगार व परिसरात पाणी साचले आहे.
राज्यातील काही विभागांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा असली तरी आगामी काळात पावसाला पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे बुधवारपर्यत संपूर्ण मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच बंगालच्या उपसागराचा काही भाग हा व्यापून टाकणार आहे. सर्वत्र पावसामध्ये सातत्य नसले तरी आगामी काळात मान्सून सक्रीय होईल असा अंदाज आहे.