नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची मुले आकाश, अनंत आणि इशा नेहमी चर्चेत असतात. परंतु दुसरीकडे भारतातील दुसरे उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे मुले प्रसिद्धीपासून दूर असतात. अनेकांना गौतमी अदानी यांच्या मुलासंदर्भात काहीच माहिती नाही. गौतम अदानी यांची पत्नी प्रिती अदानी, त्यांची दोन मुले करण अदानी आणि जीत अदानी सोशल मीडियावर नसतात. त्यांचा पूर्ण परिवार माध्यमे आणि सोशल मीडियापासून लांब असतो.
फोर्ब्सच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती $117.5 अब्ज डॉलर आहे. तसेच गौतम अदानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण $84.8 अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी यांचा मुलगा करण यांच्याकडे अदानी पोर्ट्स एंड स्पेशल इकोनॉमिक झोन (APSEZ) ची जबाबदारी आहे. ते या कंपनीने मॅनेजिंग डायरेक्टर (MD) आहे. या कंपनीत सीईओ ते राहिले आहेत. करण अदानी यांचे शिक्षण अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात झाले.
करण अदानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये मुंद्रा पोर्टमध्ये अदानी ग्रुपसोबत केली. त्यांची संपत्ती 120 कोटी 48 लाखांपेक्षा जास्त आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश यांच्याकडे 3,33,313 कोटी रुपये आहे. गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत सध्या अदानी ग्रुप फायनान्सचा उपाध्यक्ष आहे. अदानी डिजिटल लॅबचे उपाध्यक्ष ते आहे. त्यांची संपत्ती जवळपास करण इतकीच असल्याचे म्हटले जाते.
जीत अदानी यांनी अमेरिकातील पेंसिलवेनिया विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. 2019 पासून ते अदानी ग्रुपबरोबर आहे. कॅपिटल मार्केट्स, रिस्क एंड गवर्नेंस पॉलिसी आणि स्ट्रॅटेजिक फायनान्समध्ये रिसर्च करता करत ते ग्रुप सीएफओ झाले होते. त्यानंतर जून 2020 मध्ये अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचे संचालक झाले.