मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव जात आहेत. केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सचोटीने सामना करताना पाहायला मिळतेय. पण अशावेळी कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. म्युकरमायकोसिसमुळे महाराष्ट्रात 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सातशे पेक्षा अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. दरम्यान, ब्लॅक फंगस पाठोपाठ आता व्हाईट फंगसचे रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेपुढे नवं आव्हान निर्माण झालंय. (What is White Fungus? Learn all about white fungus)
बिहारच्या पटना वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 4 रुग्णांना व्हाईट फंगसचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. PMCAच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सिंह यांनी कोरोना रुग्णांमध्ये व्हाईट फंगसचा संसर्ग दिसून आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्हाईट फंगसमुळे रुग्णांच्या त्वचेवर परिणाम दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच उपचार घेण्यास उशिर झाला तर रुग्ण दगावण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे कोरोना रुग्णांना किंवा कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीमधेय याची लक्षणं दिसून येतात हे पाहणं महत्वाचं असल्याचं सिंह यांनी म्हटलंय.
व्हाईट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त घातक असून फफ्फुसातील संसर्ग याचं मुख्य कारण आहे. सोबतच व्हाईट फंगस हा माणसाच्या त्वचा, नख, तोंडाचा आतील भाग, किडणी, गुप्तांग, मेंदूवरही घातक परिणाम करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
पटनामध्ये सापडलेल्या रुग्णांची रॅपिड एन्टीजेन, एन्टीबॉडी आणि RT-PCR अशा तिनही चाचण्या करण्यात आल्या. या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या. तसंच त्यांच्यावर कोरोनावरील औषधांचाही काही फायदा होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी काही चाचण्या करण्यात आल्या. त्यात या रुग्णांना व्हाईट फंगसचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांना एन्टी फंगल औषधं दिल्यानंतर हे रुग्ण बरे होत असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
Amidst #BlackFungus infection in several states of #India, four cases of #WhiteFungus infection have been reported from Patna in Bihar.
Experts are saying White Fungus is more dangerous than Black Fungus.#COVID19 #COVID19India
Image Source- @ZHindustanTamil pic.twitter.com/Yl0OIpHz4D
— Intrigd (@Intrigd_) May 20, 2021
व्हाईट फंगसचं निदान करणं कठीण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या रुग्णांचा सिटी स्कॅन केला जातो. त्यांच्या फुफ्फुसातील संसर्गाची लक्षणं ही कोरोनाप्रमाणेच दिसून येतात. अशावेळी रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे की व्हाईट फंसगचा? हे ओळखणं कठीण होतं. अशा रुग्णांच्या कोरोना चाचण्याही निगेटिव्ह येतात. पण सिटी स्कॅनमध्ये कोरोनासारखी लक्षणं दिसून येत असतील तर बेडके (कफ)चे कल्चर केल्यानंतर व्हाईट फंगस ओळखला जाऊ शकतो.
ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोना रुग्णांना व्हाईट फंगसची लागण होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर असताना व्हाईट फंगसचा संसर्ग त्यांच्या फुफ्फुसावर होतोय. महत्वाची बाब म्हणजे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा रुग्णांना लागण होत आहे. त्याचबरोबर मधुमेह, एन्टीबायोटिक, स्टेरॉईड्सचा जास्त वापर करणाऱ्या रुग्णांवर व्हाईट फंगसचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचबरोबर नवजात बाळांमध्ये डायपर कॅन्डीडोसिसच्या रुपात व्हाईट फंगसची लागण होते, ज्यात क्रिम रंगाचे पांढरे डाग दिसून येतात. लहान मुलांमध्ये हा ओरल थ्रस्ट करतो. तर महिलांमध्ये हा ल्यूकोरियाचं मुख्य कारण आहे.
व्हाईट फंगसच्या प्रादुर्भावापासून आपण वाचू शकतो. त्यासाठी ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असेलल्या रुग्णांसाठी वापरले जाणारे उपकरण विशेष करुन ट्यूब वगैरे स्वच्छ आणि विषाणूमुक्त असावेत. ऑक्सिजन सिलिंडर ह्युमिडिफायरसाठी स्टराईल वॉटरचा वापर केला जावा.
Amravati | अमरावतीत रुग्णवाहिकेच्या चालकांचा मृत्यू; अंत्ययांत्रेला सायरन वाजवून श्रद्धांजलीhttps://t.co/QTT4T0KiFD#amravati
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
संबंधित बातम्या :
What is White Fungus? Learn all about white fungus