नवी दिल्ली : आज भारतासाठी महत्वाचा दिवस आहे. भारताची महत्वकांक्षी चांद्रयान 3 मोहिम लॉन्च होणार आहे. या मोहिमेकडे जगाच लक्ष असणार आहे. भारत पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. याआधी 2019 साली चांद्रयान 2 मोहिमेत इस्रोचा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न फसला होता. अखेरच्या टप्प्यात अपयश आलं होतं. त्यावेळी सर्व भारतीयांचे डोळे चंद्रावर लागले होते. पण मोहिम पूर्ण व्हायला अखेरची काही मिनिट बाकी असताना विक्रम लँडरशी संर्पक तुटला होता.
त्या अपयशाला मागे सोडून भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा नव्या उमेदीन चंद्रावर झेप घेणार आहे. चांद्रयान 2 मिशनमध्ये ज्या चूका झाल्या होत्या, त्यातून बोध घेऊन इस्रोने चांद्रयान 3 मध्ये काही बदल केले आहेत.
चांद्रयान 2 मोहिमेत शेवटच्या टप्प्यात काय चुकलेलं?
मागच्यावेळी चांद्रयान 2 दक्षिण ध्रुवावर कोसळलं होतं. आताही इस्रोने चांद्रयान 3 च्या लँडिंगसाठी तीच जागा निवडली आहे. चांद्रयान 2 ने 22 जुलै 2019 ला उड्डाण केलं. 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्रावर उतरण्याआधी लँडर यशस्वीरित्या ऑर्बिटरपासून वेगळा झाला. त्यानंतर लँडरचा चंद्राच्या पुष्ठभागाकडे प्रवास सुरु झाला. चंद्रापासून 2.1 किमी अंतरावर सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. पण त्यानंतर अचानक इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. त्यामुळे त्यावेळी अपूर्ण राहिलली उद्दिष्ट्य चांद्रयान 3 मध्ये पूर्ण करण्याचा उद्देश आहे.
रोव्हर चंद्रावर किती दिवस काम करेल?
चांद्रयान 3 मध्ये प्रोप्युलजन मॉड्युल, लँडर आणि रोव्हर आहे. मॉड्युलने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राच्या पुष्ठभागापासून 60 मैल अंतरावर लँडर वेगळा होईल. लँडरमधून रोव्हर बाहेर आल्यानंतर तो 14 दिवस चंद्राच्या पुष्ठभागावर काम करेल. चंद्रावरील संशोधनासाठी अमूल्य असा डाटा कलेक्ट करेल.
इस्रोने यावेळी काय बदललय?
इस्रोने या मिशनसाठी अत्याधुनिक अशा टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. चंद्रावरील धोके ओळखून वेळीच ते टाळण्यासाठी रोव्हरमध्ये खास यंत्रणा आहे. लँडरमध्येही काही खास फिचर्स आहेत. यशस्वी लँडिंगसाठी लँडरमध्ये खास कॅमेरे आहेत. चांद्रयान 2 मोहिमेत झालेल्या चुकांमधून धडे घेऊन हे बदल करण्यात आले आहेत.
14th July 2023 will always be etched in golden letters as far as India’s space sector is concerned. Chandrayaan-3, our third lunar mission, will embark on its journey. This remarkable mission will carry the hopes and dreams of our nation. pic.twitter.com/EYTcDphaES
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2023
टेक्नोलॉजी तीच, मग बदलल काय?
लँडरने पाय अधिक मजबूत करण्यात आले आहेत. मागच्यावेळी क्रॅश लँडिंग झालं होतं. चंद्रावर लँडिंग करताना गती नियंत्रित करण सर्वात मोठ चॅलेंज असतं. चांद्रयान 2 च्यावेळी 2.1 किमी अंतरावर असताना हीच गती नियंत्रित झाली नव्हती. त्यामुळे क्रॅश लँडिंग झालेलं. यावेळी अचानक गती वाढली, तरी समस्या येऊ नये, अशी व्यवस्था आहे. ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढवण्यात आली आहे. अतिरिक्त सेन्सर्सचा वापर करुन दबाव झेलण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. टेक्नोलॉजीत फार सुधारणा केलेली नाही. पण चंद्रावरच्या स्थितीशी जुळवून घेण्यासाठी लँडरच्या डिजायनिंगमध्ये बदल केला आहे. रोव्हरची टेक्नोलॉजीही तिच असेल.