VIRAL NEWS : गावची अनोखी परंपरा सोशल मीडियावर चर्चेत, मुलगी झाली म्हटलं की…

| Updated on: Sep 01, 2023 | 1:12 PM

आपल्या देशात एका गावात मुलीचा जन्म शुभ मानला जातो. त्यामुळे तिथं मुलगी झाल्यानंतर झाडं लावलं जातं. तेचं झाडं विकून त्या मुलीचं लग्न सुध्दा लावलं जात अशी त्या गावातील परंपरा आहे.

VIRAL NEWS : गावची अनोखी परंपरा सोशल मीडियावर चर्चेत, मुलगी झाली म्हटलं की...
BIHAR NEWS
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बिहार : आपल्या देशात एक असं गाव आहे, तिथं मुलगी जन्माला आल्यानंतर झाडं (CHANDAN THREE) लावलं जातं. त्यांच्या अंगणात जे झाडं लावलं जात, ते मोठं झाल्यानंतर ते झाडं विकून त्या मुलीचं लग्न लावलं जातं अशी गावची परंपरा (BIHAR TRENDING NEWS) आहे. गावातील लोकं ते झाडं लावतात आणि त्याची काळजी सुध्दा तितकीचं घेतात. ज्यावेळी ती मुलगी मोठी होते. त्यावेळी तिच्या नावाने लावलेलं झाडं विकलं जातं, त्यातून मिळालेल्या पैशात त्या मुलाचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं जातं अशी माहिती एका महिलेने दिली आहे. हा प्रकार बिहार (BIHAR NEWS) राज्यातील आहे. ते मुलीचा जन्म झाल्यानंतर अंगणात चंदनाचं झाडं लावतात.

त्या महिलेने त्या गावात सातशे घर

मिळालेल्या माहितीनुसार ही परंपरा बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील बिदुरपर येथील आहे. तिथं एक पकौली नावाचं गाव आहे. त्या गावात तुम्हाला सगळीकडं चंदनाची झाडं लावलेली दिसतील. ज्यावेळी तिथल्या गावातील मीरा देवी या महिलेशी चर्चा झाली, त्यावेळी त्या महिलेने त्या गावात सातशे घर आहेत. प्रत्येक घराच्या अंगणात चंदनाचं झाड आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, ज्यावेळी मुलीचं लग्न करायचं आहे. त्यावेळी घरात पैसे नसतील तर, त्या मुलीच्या नावाचे झाड विकायचे अशी आमच्या गावात पध्दत आहे.

मुलीचा जन्म शुभ मानला जातो

मीरा देवी यांनी सांगितलं की, समजा एखाद्या मुलगी झाली, तर आम्ही खूप शुभ मानतो.आमच्या पूर्वजांनी सुध्दा सांगितलं आहे की, चंदनाचं झाडं लावणे सुध्दा चांगला काम आहे. या कारणामुळे आम्ही मुलगी जन्माला आल्यानंतर चंदनाचं झाडं लावतो. ज्यावेळी कुणाच्या घरी मुल जन्माला येत, त्यानंतर एक चंदनाचं झाडं अंगणात लावलं जातं. त्या झाडाची काळजी घेतली जाते, त्या झाडाला कोणी तोडू नये, त्याचबरोबर इतर गोष्टींची सुध्दा काळजी घेतली जाते.

हे सुद्धा वाचा

मीरा देवी यांनी ही परंपरा असल्याचं सांगत असताना, काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी नातीचा जन्म झाला असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अंगणात एक चंदनाचं झाडं लावलं आहे. ज्यावेळी ती मुलगी मोठी होईल त्यावेळी अंगणात असलेलं झाड आम्ही विकणार आहे, त्यातून मिळालेल्या पैशात तिचं लग्न लावणार आहे. ही परंपरा मागच्या कित्येक वर्षापासून सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.