2024 निरोप अन् 2025 चे स्वागत…जगभरात कुठे सर्वात आधी अन् कुठे सर्वात शेवटी?

| Updated on: Dec 31, 2024 | 3:32 PM

2025 happy new year: संपूर्ण जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व पर्यटन स्थळे पर्यटाकांनी फुलली आहे. जगभरात वेगवेगळ्या टाईम झोननुसार वेगवेगळ्या वेळेत नवीन वर्षाचे स्वागत होते. जगभरातील 41 देश असे आहेत ज्या ठिकाणी भारताच्या आधी नवीन वर्षांचे स्वागत केले जाते.

2024 निरोप अन् 2025 चे स्वागत…जगभरात कुठे सर्वात आधी अन् कुठे सर्वात शेवटी?
Year 2025
Follow us on

2025 happy new year: नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. रात्री 12 वाजता 2024 ला निरोप दिला जाणार असून 2025 चे स्वागत करण्यात येणार आहे. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व पर्यटन स्थळे पर्यटाकांनी फुलली आहे. जगभरात वेगवेगळ्या टाईम झोननुसार वेगवेगळ्या वेळेत नवीन वर्षाचे स्वागत होते. जगभरातील 41 देश असे आहेत ज्या ठिकाणी भारताच्या आधी नवीन वर्षांचे स्वागत केले जाते.

जगात नवीन वर्ष सर्वात आधी किरीटीमाटी बेटावर साजरे केले जाते. या बेटाला ख्रिश्मस बेटही म्हटले जाते. हे बेट प्रशांत महासागरातील एटोल आणि किरिबाती गणराज्यचा भाग आहे. या बेटावरील वेळ भारताच्या 7 तास 30 पुढे आहे. म्हणजे भारतात जेव्हा 3.30 वाजलेले असतात तेव्हा या बेटावर रात्रीचे 12 वाजलेले असतात.

भारतातील वेळ
कोणत्या देशात त्यावेळी 12 वाजतात
दुपारी 3.30 किरीटीमाटी द्वीप
दुपारी3.45 चैथम द्वीप
दुपारी 4.30 न्यूझीलँड
संध्याकाळी 5.30
फिजी आणि रशियातील काही शहरे
संध्याकाळी 6.30
ऑस्ट्रेलियामधील काही शहरे
रात्री 8.30
जापान, दक्षिण कोरिया
रात्री 8.45
पश्चिम ऑस्ट्रेलिया
रात्री 9.30 चीन, फिलिपींस
रात्री10.30 इंडोनेशिया

किरितीमती बेटानंतर न्यूझीलंडच्या टोंगा आणि चथम बेटांवर नवीन वर्षाचे स्वागत केले. दक्षिण पॅसिफिकमधील किरिबाटीच्या नैऋत्येस अमेरिकन सामोआ आणि नियू या बेटांवर नवीन वर्ष शेवटी साजरे केले जाते. एक काळ असा होता जेव्हा सामोआ (अमेरिकन सामोआ नव्हे) नवीन वर्ष साजरे करणाऱ्या शेवटच्या देशांपैकी एक होता. 2011 मध्ये काही बदल झाले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडशी संरेखित करण्यासाठी काही ठिकाणाचे टाईम झोन बदलले गेले. आता सामोआ हा उत्सव साजरा करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये आला आहे.

41 देशांमध्ये भारताच्या आधी नववर्ष

जगभरातील वेगवेगळ्या टाइम झोनमुळे वेगवेगळ्या वेळी नवीन वर्ष साजरे केले जाते. भारतापूर्वी नववर्षाचे स्वागत करणारे 41 देश आहेत. यामध्ये किरिबाटी, सामोआ आणि टोंगा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, रशियाचे काही भाग, म्यानमार, जपान आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.