शस्त्रक्रिया करत असताना कळाले वडील मुख्यमंत्री होणार, तिने आधी कर्तव्य बजावले मग घर गाठले

| Updated on: Dec 12, 2023 | 4:16 PM

आपले वडील मुख्यमंत्री होणार आहे यापेक्षा आनंदाची बातमी कोणासाठी काय असू शकते. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोहन यादव यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्यांची मुलगी रुग्णालयात शस्त्रक्रियेची तयारी करत होती. पण बातमी कळाल्यानंतर ही त्यांनी आधी कर्तव्य बजावले त्यानंतर घर गाठले.

शस्त्रक्रिया करत असताना कळाले वडील मुख्यमंत्री होणार, तिने आधी कर्तव्य बजावले मग घर गाठले
Follow us on

इंदूर : मध्य प्रदेशातील नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करत भाजप हायकमांडने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आमदार मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. यावेळी मोहन यादव यांचे कुटुंबीयही सामील झाले होते. मात्र, त्यावेळी मोहन यादव यांची मुलगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होती.

मोहन यादव यांची मुलगी आकांक्षा डॉक्टर आहे. मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाली तेव्हा त्यांची डॉक्टर मुलगी रुग्णालयात होती. आकांक्षा ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनची तयारी करत होती.

कर्तव्य पार पाडून साजरा केला आनंद

वडील मुख्यमंत्री झाल्याची बातमी आल्यानंतरही आकांक्षा आपले कर्तव्य बजावायला विसरली नाही. ऑपरेशन थिएटरमध्येच मुलगी आकांक्षाला तिचे वडील मुख्यमंत्री होणार असल्याची बातमी समजली. मात्र, या काळातही ती आपले कर्तव्य बजावण्यास विसरली नाही. तिने प्रथम रुग्णावर शस्त्रक्रिया केली आणि नंतर गीता कॉलनीतील तिच्या निवासस्थानी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर आकांक्षानेही कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा केला.

मोहन यादव यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्या बहिणी देखील आनंद व्यक्त केला. मोहन यादव यांना  दोन मुले आणि एक मुलगी आहे.

काय म्हणाले शिवराज सिंह

मोहन यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवराज सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. लोककल्याणकारी योजना राबवणार आणि मध्य प्रदेश प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने नवीन उंची गाठेल.