Ram Mandir donation | अयोध्येत रामलला आपल्या भव्य महालात विराजमान झालेत. राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा होताच रामभक्तांची 500 वर्षांची प्रतिक्षा संपली. अवधपुरी येथे उभं राहिलेल शानदार राम मंदिर फक्त एक इमारत नाहीय, त्यात भावना, समर्पण, त्याग आणि तपस्या आहे. 500 वर्षाच्या संघर्षानंतर हे स्वप्न साकार झालय. भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्यांसह खास लोकांनी देणगी दिलीय. काहींनी कोट्यवधी तर काहींनी लाखांमध्ये देणगी दिली आहे. मंदिर निर्माणामध्ये सहकार्य केलय. कुठल्या दिग्गजाने किती देणगी दिलीय ते जाणून घेऊया.
आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी मंदिर निर्माणासाठी सर्वाधिक देणगी दिलीय. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटनुसार बापूंनी मंदिर निर्माणासाठी 11.3 कोटी रुपयाचं योगदान दिलय. अमेरिका,कॅनडा आणि युनायटेड किंगडममधल्या त्यांच्या अनुयायांनी व्यक्तीगत पातळीवरही 8 कोटी रुपयाच योगदान दिलय.
कोणी किती देणगी दिली?
असं म्हटलं जात की, राम मंदिर योजनेसाठी आतापर्यंत 5000 कोटीपेक्षा अधिकची देणगी मिळाली आहे. एका स्टेटमेंटमध्ये बापूंनी म्हटलं की, आधीच राम जन्मभूमी ट्रस्टला 11.3 कोटी रुपये दिले आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ते कथावाचन करतील, त्यावेळी परदेशातून जमवलेली धनराशी सुद्धा राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडे सोपवली जाईल. अशा प्रकारे एकूण देणगी राशीची रक्कम 18.6 कोटी रुपये आहे.
तेलगु सुपरस्टारने किती देणगी दिली?
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी 2.5 कोटी रुपयाची देणगी दिलीय. काही रिपोर्ट्सनुसार अक्षयकुमारने सुद्धा मंदिर निर्माणासाठी देणगी दिलीय. पण त्याने रक्कमेचा खुलासा केलेला नाही. रिपोर्ट्सनुसार तेलगु सुपरस्टार पवन कल्याणने मंदिर निर्माणासाठी 30 लाखाची देणगी दिलीय. अभिनेता मुकेश खन्नाने फेब्रुवारी 2021 मध्ये मंदिर निर्माणासाठी अधिकाऱ्यांना 1.1 लाख रुपयांचा चेक दिला.
गुप्तदेणगी कोणी दिली?
विश्व हिंदू परिषदेने 2021 मध्ये एका व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात अभिनेता मनोज जोशी राम मंदिर आणि भगवान रामाबद्दल बोलत होता. रिपोर्ट्सनुसार त्यांनी सुद्धा मंदिर निर्माणासाठी गुप्तदेणगी दिली आहे. हंगामा 2 आणि भुज सारख्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री एक्ट्रेस प्रणिता सुभाषने मंदिर निर्माणासाठी 1 लाख रुपये देणगी दिलीय. भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सुद्धा मंदिर निर्माणासाठी देणगी दिलीय.