New Parliament Inauguration : नव्या संसदेत मंत्रोच्चार करण्यासाठी दक्षिण भारतातून आलेले अधीनम कोण आहेत?

| Updated on: May 28, 2023 | 4:50 PM

New Parliament Inauguration : सेंगोल स्थापनेच्या कार्यक्रमाला फक्त कट्टरपंथीय दक्षिण ब्राह्मणांना बोलावल जाणं, दुर्भाग्यपूर्ण आहे असं सपा नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी म्हटलं आहे. कोण आहेत हे अधीनम ?

New Parliament Inauguration : नव्या संसदेत मंत्रोच्चार करण्यासाठी दक्षिण भारतातून आलेले अधीनम कोण आहेत?
New Parliament Inauguration
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाच्या नव्या संसदेच उद्घाटन केलं. तामिळनाडूतून आलेल्या अधीनम संतांनी वैदिक मंत्रोच्चार आणि विधि-विधानासह पूजा-अर्चना केली. या विधिवत पूजेवर समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलय. सेंगोलच्या स्थापना कार्यक्रमात फक्त कट्टरपंथीय दक्षिण ब्राह्मणांना बोलावणं दुर्भाग्यपूर्ण आहे. या विशेष कार्यक्रमाला सर्व धर्माचे गुरु किंवा प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं.

उद्घाटन कार्यक्रमाला ज्या पद्धतीने दक्षिण भारतातील गुरुंना बोलावण्यात आलं, त्यातून भाजपाचा घृणास्पद विचार दिसून येतो, अशी टीका स्वामी प्रसाद मौर्या यांनी केली. भाजपा असं करुन ब्राह्मणवादाला स्थापित करण्याचा निंदनीय प्रयत्न करत आहे, असं त्यांनी म्हटलय. आता प्रश्न हा निर्माण होतो की, दक्षिण भारतातून येणारे अधीनम कोण आहेत? त्यांच महत्व काय आहे?

अधीनम कोण आहेत ?

अधीपती या संस्कृत शब्दापासून अधीनम शब्द घेण्यात आलाय. याचा अर्थ होतो, देव किंवा मालक. दक्षिणेत अधीनमच नेतृत्व ब्राह्मण करतात. पण काही अधीनम असे सुद्धा आहेत, ज्यांचे गुरु गैर-ब्राह्मण आहेत. थिरुवदुथुरै अधीनमच नेतृत्व एक वैष्णव संत करतायत, जे ब्राह्मण नाहीयत,

दक्षिण भारतात असे अनेक मठ आहेत, ज्यांच नेतृत्व आचार्य किंवा स्वामी करतात. अधीनम हे हिंदू धर्मातील एका विशेष संप्रदायाशी जोडलेले आहेत. त्यांच्याकडे मोठ्या संख्येने समर्थक असतात. हिंदू संस्कृती आणि परंपराचा विस्तार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते.

दक्षिण भारतात हे अधीनम हिंदू धर्म आणि संस्कृतीचा महत्वाचा भाग आहेत. ते प्रसार करतात. हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी ते एक मंच प्रदान करतात.

अधीनमच महत्व काय?

हिंदू धर्मात नेहमीच अधीनम महत्वाचे आहेत. यांच्या माध्यमातूनच दक्षिणेत हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रचार करण्यात आला. धार्मिक विस्तार झाला. शाळा, कॉलेज आणि शैक्षिण संस्था सुरु झाल्यानंतर इथे धर्माच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी झाली. धर्माच शिक्षण घेणारे कमी झाल्यानंतर अधीनमांनी आपली जबाबदारी निभावली. धर्माचा प्रचार केला. गरीब आणि गरजवंतांना मदत केली.


दक्षिणेत अनेक प्रकारचे अधीनम आहेत. मदुरै अधीनमांची सर्वात जास्त चर्चा होते. दक्षिण भारतातील यांना सर्वात जुन अधीनम म्हटलं जातं. यांचा मठ मदुरैमध्ये आहे. त्याशिवाय थिरुवदुतुरई अधीनम आहेत. हिंदू संस्कृतीला प्रोत्साहन देण्याशिवाय ते स्कॉलरशिप देण्यासाठी सुद्धा ते ओळखले जातात. धर्मापुरम अधीनम तामिळनाडूच्या मयिलाडुतुरैमध्ये आहेत. हा अधीनम सामाजिक कार्य आणि शिक्षण संस्थांशी जोडलेला आहे.

अधीनम काय करतात?

शास्त्र शिकवणं हा अधीनमच्या कार्यक्षेत्राचा भाग आहे. त्याशिवाय धार्मिक अनुष्ठानों आणि समारंभाच आयोजन करणं, हिंदू संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण आणि गरीब-गरजवंतांना मदत करणं हे यांच काम आहे. हिंदू धर्म, संस्कृतीवर पुस्तकं-लेख प्रकाशित करण, शाळा, कॉलेजस चालवण हा यांच्या कार्यक्षेत्राचा भाग आहे.