NSA Ajit Doval: भारताचा ‘जेम्स बॉन्ड’ अजित डोवाल यांच्यावर मोदींचा पुन्हा विश्वास, अनेक मिशन फत्ते करणाऱ्यास तिसऱ्यांदा NSA पद, किती आहे त्यांचा पगार

| Updated on: Jun 15, 2024 | 9:19 AM

NSA Ajit Doval: एनएसए पदावर रुज होण्यापूर्वी अजित डोवाल इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) प्रमुख होते. 1968 मध्ये ते आयपीएस म्हणून पोलिस सेवेत रुजू झाले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक मोठा निर्णय अजित डोवाल यांच्या सल्ल्यानेच घेतला जातो.

NSA Ajit Doval: भारताचा जेम्स बॉन्ड अजित डोवाल यांच्यावर मोदींचा पुन्हा विश्वास, अनेक मिशन फत्ते करणाऱ्यास तिसऱ्यांदा NSA पद, किती आहे त्यांचा पगार
ajit doval
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर कॅबिनेटमध्ये त्यांचे विश्वासू सल्लागार कायम राहिले. तसेच महत्वाच्या पदांवर त्यांचा सर्वाधिक विश्वास असणाऱ्या व्यक्तीची निवड करत आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी (NSA) तिसऱ्यांदा अजित डोवाल यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रधान सचिवपदी पी. के. मिश्रा यांनाच बसवले आहे.

अशी जमली मोदींसोबत टीम

मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर 2014 मध्ये अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून 30 मे 2014 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये मोदी सरकार परत आल्यानंतर 3 जून 2019 रोजी एनएसएची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मोदी सरकारने एनएसए अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला. यापूर्वी त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते. आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची एनएसए केले आहे. एनएसए पदावर रुज होण्यापूर्वी अजित डोवाल इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) प्रमुख होते. 1968 मध्ये ते आयपीएस म्हणून पोलिस सेवेत रुजू झाले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक मोठा निर्णय अजित डोवाल यांच्या सल्ल्यानेच घेतला जातो.

किती शक्तीशाली असतो एनएसए?

एनएसए पद सर्वात शक्तिशाली समजले जाते. एनएसए फक्त राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित नाही तर परराष्ट्र नीती आणि इतर प्रकरणात पंतप्रधानांना सल्ला देत असतात. देशातील अंतर्गत सुरक्षा आणि देशा बाहेरील धोके याची माहिती पंतप्रधानांना एनएसए देत असतो. पंतप्रधानांच्या वतीने धोरणात्मक आणि संवेदनशील मुद्द्यांवर देखरेख ठेवचे काम ते करतात. ते नियमित आयबी आणि रॉ सारख्या एजन्सींकडून माहिती मिळवून पंतप्रधानांना देत असतात.

हे सुद्धा वाचा

सर्जिकल स्ट्राइक किंवा एअरस्ट्राइक हे निर्णय एनएसएच्या सल्लाने घेण्यात आले. उरी हल्लानंतर 2016 मध्ये पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर एअरस्ट्राइक केली होती, त्यात अजीत डोवाल यांची महत्वाची भूमिका होती. 2017 मध्ये डोकलाममध्ये भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढला होतो. तो संपवण्यास त्यांची भूमिका मोलाची ठरली होती.

किती आहे अजित डोवाल यांचा पगार

1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोवाल केरळमधील आहेत. 1972 मध्ये ते आयबीमध्ये रुजू झाले. त्यांनी अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये गुप्तहेर एजंट म्हणूनही काम केले आहे. अनेक वर्षे आयबीच्या ऑपरेशन्स विंगमध्ये काम केल्यानंतर त्यांची आयबीच्या संचालकपदी नियुक्ती झाली. 2005 मध्ये ते आयबी संचालक पदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर ते सक्रीय राहिले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 1,37,500 रुपये पगार दिला जातो. तसेच त्यांना पेन्शनही मिळते.