CM BS Yediyurappa Resigns | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत तीन नावे, प्रल्हाद जोशीं सर्वाधिक चर्चेत; वाचा सविस्तर

| Updated on: Jul 26, 2021 | 1:25 PM

बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून तीन नावे मुख्यत्वे चर्चेत आहेत. (who is Next CM of Karnataka?, BJP central leadership to spring a surprise?)

CM BS Yediyurappa Resigns | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत तीन नावे, प्रल्हाद जोशीं सर्वाधिक चर्चेत; वाचा सविस्तर
Karnataka leader
Follow us on

बेंगळुरू: बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून मुख्य तीन नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यात केंद्रातील मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या प्रल्हाद जोशींच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. त्यामुळे जोशींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार की राज्यातील नेत्याकडेच राज्याची सूत्रे जाणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. (who is Next CM of Karnataka?, BJP central leadership to spring a surprise?)

बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या या रेसमध्ये प्रल्हाद जोशी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकचे खासदार आहे. त्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचंही नाव मुख्यत्वे चर्चेत आहे. या तीन नावांखेरीज भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत.

बोम्मईंचा सावध पवित्रा

भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. गेल्या काही दिवसात बोम्मई यांनी नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. त्यांनी नुकतीच प्रल्हाद जोशी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत त्यांचंही नाव आलं होतं. मात्र, त्यावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. बोम्मई यांनी सावध पवित्रा घेत काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

येडियुरप्पांच्या तीन अटी

>> मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींकडे तीन अटी ठेवल्या होत्या. या अटी पक्षश्रेष्ठींनी मंजूर केल्याचं सांगितलं जात आहे.

>> येडियुरप्पांचा मोठा मुलगा खासदार बीएस राघवेंद्र यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावं

>> येडियुरप्पा यांचा दुसरा मुलगा आणि कर्नाटक भाजपचे उपाध्यक्ष बीएस विजेंद्र यांना कर्नाटकाच्या मंत्रिमंडळात घ्यावं

तसेच कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री आपल्याच सहमतीने निवडण्यात यावा.

मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण आहेत?

प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

मुरगेश निराणी हे येडियुरप्पा सरकारमध्ये कोळसा मंत्री आहेत. ते लिंगायत समुदायातील आहेत.

बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे गृहमंत्री असून येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय समजले जातात.

लक्ष्मण सवदी हे उपमुख्यमंत्री आहेत. तेही लिंगायत समुदायातील आहेत.

बसवगौडा पाटील यतनाळ हे विजयपुराचे आमदार आहेत. तेही लिंगायत समुदायातून येतात. त्यांनीच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती. (who is Next CM of Karnataka?, BJP central leadership to spring a surprise?)

 

संबंधित बातम्या:

Karnataka CM BS Yediyurappa Resigns | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समुदायातील नको; येडियुरप्पा यांची भाजपला सूचना

कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं ‘मिशन कमळ’ यशस्वी   

(who is Next CM of Karnataka?, BJP central leadership to spring a surprise?)