चंदीगड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीदासाठी निश्चित झालं आहे. थोड्याच वेळात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही होणार आहे. रंधावा हे गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे समजले जात आहेत. शिवाय ते नवज्योतसिंग सिद्धू यांचेही निकवर्तीय समजले जात आहेत. (Who is Sukhjinder Singh Randhawa?, read about senior politicians)
सुखजिंदरसिंग रंधावा हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात आहेत. ते पंजाब सरकारमध्ये सहकार आणि तुरुंग प्रशासन मंत्री आहेत. तसेच त्यांनी पंजाबमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
रंधावा हे गुरुदासपूर जिल्ह्याचे रहिवासी आहे. ते बाबा नानक विधानसभा मतदारसंघातून 2002, 2007 आणि 2017 मध्ये निवडून आले आहेत. ते राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरीही होते.
रंधावा यांच्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये आहेत. त्याचे वडील संतोख सिंग दोन वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पंजाबमधील काँग्रेसचे बडे नेते म्हणून ते परिचित होते. रंधावा यांनी वडिलांकडूनच राजकारणाचं बाळकडू घेतलं.
रंधावा हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी सिद्धूंसह कॅप्टन अमरिंदर सिंग विरोधात बंड पुकारलं होतं. रंधावा स्वत: मंत्री असतानाही अमरिंदर सरकार निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत होते.
आक्रमक नेते म्हणून रंधावा यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी बादल कुटुंबाच्या विरोधातही आक्रमक पवित्रा घेतला होता. 2015मध्ये गुरु ग्रंथ साहिबचा अवमान झाल्यानंतर आंदोलन झालं होतं. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आरोपींवर गुन्हे दाखल न केल्याने रंधावा यांनी मोठं आंदोलन केलं होतं. तसेच त्यांनी बादल कुटुंबावरही या प्रकरणी जोरदार हल्लाबोल केला होता.
सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रंधावा हे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच रंधावा यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. रंधावा यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. रंधावा मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉय राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Who is Sukhjinder Singh Randhawa?, read about senior politicians)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 Super Fast News | 19 September 2021 https://t.co/BdRdiXtpTa #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
संबंधित बातम्या:
(Who is Sukhjinder Singh Randhawa?, read about senior politicians)