बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी कोण?, बेस्ट सीएम कोण? पाहा नितीन गडकरी यांचे उत्तर काय?

| Updated on: Mar 30, 2025 | 4:48 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा खरा वारसदार कोण या संदर्भात वाद सुरु आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पूत्र असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेबांचे खरे वारसदार मानत आहेत. अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या व्यासपीठावर आपले मत मांडले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी कोण?, बेस्ट सीएम कोण? पाहा नितीन गडकरी यांचे उत्तर काय?
Follow us on

​शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युनंतर राजकीय वारसदार म्हणून अनेक दावेदार पुढे आले आहेत. त्यांचे पूत्र उद्धव ठाकरे, पुतणे राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रेसमध्ये सामील आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की या विषयावर आता जनतेला निर्णय घ्यायचा आहे. कारण तिघेही आपले चांगले मित्र आहेत असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिश्कीलपणे सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा सांभाळण्यावरुन वाद चालू आहे. काही जण बाळासाहेब ठाकरे यांचा खरा उत्तराधिकारी म्हणून त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांना मानतात. परंतू या वारसदाराच्या यादीत ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे देखील आहेत. राज ठाकरे भाषण आणि बोलण्यात बाळासाहेबांप्रमाणेच रोखठोक आहेत. परंतू आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणखी एक वारसदार म्हणून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे आले आहे. परंतू शिवसेनेची दिशा आणि पार्टीचे नेृतत्व बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव बळकावत आपणच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक म्हणून वारसदार आहोत असे वारंवार म्हटले आहे. या प्रश्नावर रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. गडकरी यांना टीव्ही 9 नेटवर्कच्या कॉनक्लेव्हमध्ये तीन पर्याय दिले होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांपैकी एकाची निवड करण्यास नितीन गडकरी यांना सांगण्यात आले मात्र नितीन गडकरी यांनी थेट एकाची निवड करण्यास नकार दिला.!

हे सुद्धा वाचा

बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते – गडकरी

गडकरी यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की , “बाळासाहेबांना माझ्याबद्दल खूप प्रेम होते आणि या तिघांशी माझे चांगले संबंध आहेत. बाळासाहेब यांचा उत्तराधिकारी कोण हे जनता ठरवेल. माझे तिघेही मित्र आहेत आणि राजकारण वेगळे आणि तिघांचे संबंध वेगळ्या पातळीवरचे आहेत.

महाराष्ट्राचा बेस्ट सीएम कोण?

TV9 च्या व्यासपीठावर उत्तराधिकारी कोण या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी बॉल सोडून दिला असला तरी या कार्यक्रमात महाराष्ट्राचा बेस्ट सीएम कोण ? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? या आणखी एका गुगलीवर मात्र गडकरी यांनी हसत सांगितले की दोन्हीही चांगले आहेत., परंतू माझ्या नजरेत देवेंद्रजी यांनी खूप चांगले काम केले आहे आणि आता ही चांगले काम करीत आहेत.