Madhya Pradesh Election Result : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसने राज्यात भाजप विरोधी लाट असल्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे. जनतेने पुन्हा एकदा भाजपला बहुतम दिले आहे. सध्या 160 हून अधिक जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु आहे. लाडू वाटून आनंद साजरा केला जात आहे.
भाजपच्या विजयी आघाडीनंतर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे अभिनंदन करताना एक महिला भावूक झाली आहे. त्या शिवराज सिंह यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचं अभिनंदन करत आहेत. या दरम्यान त्या भावूक झाल्या आहेत. ही महिला मुख्यमंत्री निवासातील कर्मचारी असून तिचे नाव राधाबाई आहे.
#WATCH | Madhya Pradesh | A staffer at CM House, Radha Bai gets emotional as she gives a flower to CM Shivraj Singh Chouhan and congratulates him.
CM Chouhan is leading in his constituency Budhni and the party is leading on 161 seats in the state. pic.twitter.com/NFdSFrMnjG
— ANI (@ANI) December 3, 2023
मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाचं श्रेय महिलांना दिले जात आहे. शिवराज सरकारने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ‘लाडली’ योजनेचा भाजपच्या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1250 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ही रक्कम तीन हजार रुपये करण्याची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 116 आहे. शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्य प्रदेशात विजय मिळवून दिला आहे. मध्यप्रदेशातील जनतेच्या मनात मोदी आहेत आणि मोदींच्या मनात मध्य प्रदेश.