भारताला स्वातंत्र 15 ऑगस्ट या तारखेला मिळाले. संपूर्ण जग झोपलेले असताना मध्यरात्री भारत स्वातंत्र झाला. स्वातंत्र्याची ही तारीख आणि मध्यरात्रीची वेळ निवडण्यामागे कारण काय आहे? त्यासाठी भविष्यवाणी किंवा ज्योतिषशास्त्राचा काही संदर्भ आहे का? भारतातील नेत्यांची ही मागणी होती का? पाहू या…
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या. त्यात लेबर पार्टी सत्तेत आली. पंतप्रधानपदी क्लेमेंट एटली यांची निवड झाली. त्यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र करण्याची घोषणा केली. त्यामुळे व्हायसराय लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे सोळा महिने शिल्लक होते. परंतु त्यांनी 3 जून 1947 रोजीच 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र देण्याची घोषणा केली. त्यांच्याकडे 30 जून 1948 पर्यंतची वेळ असताना 15 ऑगस्ट तारीख त्यांनी का निश्चित केली? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पत्रकार कुलदीप नैय्यर यांनी लंडनमध्ये 1971 रोजी माउंटबेटन यांची भेट घेतली. माउंटबॅटन यांनी सांगितले की, भारतामधील परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आपले काम पूर्ण करायचे होते.
लेखक लॅरी कॉलिन्स आणि टोमिनिक लॅपियर यांनी त्यांच्या ‘फ्रीडम एट मिडनाइटम’ध्ये पुस्तकात लॉर्ड माऊंटबॅटन यांचा संदर्भ देत म्हटले आहे की, भारताला स्वातंत्र देण्यासाठी मी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा विचार करत होतो. परंतु 15 ऑगस्ट ही तारीख अचानक माझ्या डोक्यात आली. कारण दुसऱ्या महायुद्धात या दिवशी जापानने आत्मसमर्पण केले होते. त्याला दोन वर्ष पूर्ण झाले होते.
15 ऑगस्ट ही तारीख जाहीर होताच पंडित आणि ज्योतिषीही आपली पंचांग उघडले. “फ्रीडम ॲट मिडनाईट” मध्ये, डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी लिहिले, “काशी आणि दक्षिणेतील ज्योतिषींनी म्हटले की 15 ऑगस्ट हा दिवस शुभ नाही. त्यामुळे भारताला नरक यातना सहन कराव्या लागतील. यामुळे देशाने आणखी एक दिवस ब्रिटिश राजवट सहन करावी.
मग ज्योतिषींना उपाय विचारला. त्यानंतर त्यांनी अभिजित मुहूर्त सांगितला. हा मुहूर्त 14 ऑगस्टच्या रात्री 11.51 ते 12.39 होता. त्यामुळे तारीख न बदलता मध्यरात्री भारत स्वातंत्र झाला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या ऐतिहासिक भाषणात म्हटले होते की, आपला भारत दीर्घ झोपेनंतर आणि संघर्षानंतर पुन्हा जागृत झाला आहे. आपण नव्याने इतिहास लिहित आहोत. आता आपण घडवलेला इतिहास इतरांना लिहिण्यास भाग पाडेल.
हे ही वाचा…
पेट्रोलपासून दुधापर्यंत, बटाट्यापासून सोन्यापर्यंत गेल्या 77 वर्षांत कसा बदलला भारत