550 वर्षे जुने नाते… बिष्णोई समाज काळवीटचा का करतो इतका आदर, सलमान खानने तोडले होते 9 नियम

| Updated on: Oct 18, 2024 | 10:53 AM

bishnoi community in rajasthan: सलमान खानसोबत बिश्नोई समाजाचा वाद 1998 मध्ये सुरू झाला. चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावड गावाजवळ सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

550 वर्षे जुने नाते... बिष्णोई समाज काळवीटचा का करतो इतका आदर, सलमान खानने तोडले होते 9 नियम
सलमान खान
Follow us on

bishnoi community and salman khan: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान यालाही सातत्याने धमक्या मिळत आहेत. 1998 मध्ये मारल्या गेलेल्या दोन काळ्या कळवीट प्रकरणामुळे सलमान खानसमोरील अडचणी कमी होत नाही. 1998 मध्ये अभिनेता सलमान खान याने जोधपूरजवळ ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान दोन काळवीटची शिकार केली होती. बिष्णाई समाज या काळ्या कळविटची पूजा करतो. त्यामुळे सलमान खानविरोधात हा समाज संतप्त झाला आहे.

लॉरेन्स बिष्णाई पाच वर्षांचा…

सलमान खानने कळवीटची शिकार केली तेव्हा लॉरेन्स बिष्णाई पाच वर्षांचा होता. त्याने सलमानकडून बदला घेण्याची शपथ घेतली आहे. बिष्णोई समाजाचे काळवीट आणि चिंकराशी घट्ट नाते आहे. या समाजाची 1485 मध्ये स्थापन झाली. गुरु जंभेश्वर यांनी या समाजाची स्थापना केली. त्यांनी 29 नियम बनवले आहेत. त्यातील 9 नियम सलमान खानने तोडले. झाडे आणि प्राण्यांचे संरक्षण करण्याचे गुरु जंभेश्वर यांनी म्हटले आहे. यामुळे प्राण्यांच्या रक्षणासाठी बिष्णाई समाज मराण्यास तयार असतो. या समाजातील महिला सोडलेल्या काळवीटांना त्यांच्या मुलांप्रमाणे वाढवतात. त्यांना स्वत:चे दूध पाजतात.

मुलांप्रमाणे काळविटचा सांभाळ

गुरु जंभेश्वर यांनी काळवीटाला आपला अवतार मानून त्याचा आदर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा समाज काळवीटचा मोठा आदर करतो. अनिल बिश्नोई या शेतकऱ्याने तर 10,000 काळविटांना वाचवले आहे. एकदा तर शिकारींनी त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती. त्यानंतरही ते घाबरले नव्हते. बिश्नोई स्त्रिया विशेषतः काळवीट आणि चिंकाराची खूप काळजी घेतात. त्या कळपापासून वेगळ्या झालेल्या या प्राण्यांना अनेकदा दुग्धपान करवतात. आपल्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करणे हे त्यांचे एक धार्मिक कर्तव्य आहे.

हे सुद्धा वाचा

सलमान अन् वाद…

सलमान खानसोबत बिश्नोई समाजाचा वाद 1998 मध्ये सुरू झाला. चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावड गावाजवळ सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणाची चौकशी केली असता घटनास्थळी काळे हरण आढळून आले. या प्रकरणी सलमान खानला तुरुंगात जावे लागले होते. बिश्नोई समाज अजूनही सलमान खानवर 29 पैकी 9 नियम तोडल्याचा आरोप करतो. सलमान खानने गुरु जंभेश्वराच्या धाममध्ये येऊन माफी मागितल्यास समाज त्याला माफ करेल, असे समाजाकडून सांगण्यात येते.हा समाज आणि कळवीटचे नाते 550 वर्षे जुने आहे.