IPS Officer Story, UPSC Success Story: संघ लोक सेवा आयोग (UPSC) ची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. त्यासाठी युवक रात्रंदिवस अभ्यास करतात. लाखो जणांमधून शेकडो जणांना त्यात यश येते. या परीक्षेमध्ये मिळालेल्या यशानंतर आएएस, आयपीएस होतात. अनेक वर्षे सरकारी वर्दीत राहून काही धडाकेबाज अधिकाऱ्यांचे मन सरकारी नोकरीत रमले नाही. त्यामुळे तीन आयपीएस अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. विशेष म्हणजे त्या तिन्ही अधिकाऱ्यांचे बिहार कनेक्शन आहे. त्यातील एक महाराष्ट्रातील रहिवाशी आहे.
IPS Shivdeep Lande Story, IPS Biography: महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले शिवदीप लांडे यांचा जन्म 29 ऑगस्ट 1976 रोजी अकोला जिल्ह्यात झाले. ते बिहारमधील पूर्णिया रेंजचे आयजी होते. त्यानंतर त्यांची नेमणूक पटणात आयजी ट्रेनिंगच्या पदावर झाली. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला. त्याबाबतचे नोटिफिकेशन केंद्रीय गृह मंत्रालयने 13 जानेवारी रोजी काढले आहे. शिवदीप लांडे यांनी 2005 मध्ये यूपीएससी परीक्षा पास क्रॅक केली. वर्षभराच्या ट्रेनिंगनंतर ते बिहार कैडरचे आयपीएस बनले.
IPS Kamya Mishra, IPS Biography: शिवदीप लांडे यांच्यापूर्वी बिहार कैडरच्या आयपीएस काम्या मिश्रा यांनीही राजीनामा दिला. त्या 2019 बॅचच्या आयपीएस अधिकारी होत्या. यूपीएससी परीक्षेत त्यांची निवड हिमाचल प्रदेश कैडरसाठी झाली. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची बदली बिहार कैडरमध्ये करण्यात आली. त्या दरभंगा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक होत्या. वयाच्या 22 वर्षी त्या आयपीएस झाल्या होत्या. त्यांनी केवळ 5 वर्ष पोलिसांची नोकरी केली.ऑगस्ट 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा मंजूर न केल्यामुळे त्या गृह विभागाने त्यांना 180 दिवसांची रजा मंजूर केली होती.
IPS Anand Mishra: आयपीएस आनंद मिश्रा यांनी 2024 बिहार कैडरचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी म्हटले होते मला स्वतंत्र जीवन जगायचे आहे, यामुळे मी आयपीएसची नोकरी सोडत आहे. त्यानंतर त्यांनी बक्सर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. ते बिहारमधील बक्सरचे रहिवाशी आहे. त्यांनी वयाचा 22 वर्षी 2011 मध्ये यूपीएससी क्रॅक केली होती. त्यावेळी त्यांना मणिपूर कैडर मिळाले होते.
हे ही वाचा…
महाराष्ट्रातील रहिवाशी सिंघम IPS यांचा राजीनामा अखेर केंद्राकडून मंजूर, IPS पुढे काय करणार?