नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : भारताचं चंद्रयान-3 इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. चंद्रयान येत्या 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. दरम्यान, रशियाने देखील अचानक सोडलेले लुना-25 हे यान देखील दक्षिण ध्रुवावर त्याच तारखेच्या आसपास उतरणार आहे. ही दोन्ही याने येत्या 16 ऑगस्ट चंद्राच्या 100 किमी अंतरावरुन फिरत असतील. पृथ्वीवरुन चंद्राची नेहमी दिसणारा भाग जसा आहे तसा कधीच न दिसणारा एक भागही आहे. येथे भारत उणे 230 तापमानात आपले यान उतरविणार आहे. काय आहे या जागेत खास ?
चंद्राच्या आपल्याला कधीच न दिसणाऱ्या भागाला ‘डार्क साईडऑफ द मून’ किंवा ‘फार साईड ऑफ दे मून’ म्हणतात. भारताच्या चंद्रयान-3 चे लक्ष्य डार्क साईडमध्ये सॉफ्ट लॅंडींग करण्याचे आहे. या डार्क साईडचे तापमान अंटार्टीका सारखे अतिथंड आहे. कारण येथे सूर्याची किरणे पोहचू शकत नाहीत. चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्टच्या सायंकाळी सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत कोणताही देश पोहचलेला नाही. परंतू भारताचे चंद्रयान-1 आणि चंद्रयान-2 या दोन्ही मोहीमा याच भागातील जमिनीखाली काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी आयोजित केल्या होत्या. साल 2008 रोजी चंद्रयान-1 मध्ये चंद्राच्या पृष्टभागावर लॅंडींग नव्हते. केवळ यानाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून माहीती मिळविली होती. तर 2019 मध्ये चंद्रयान-2 मध्ये सॉफ्ट लॅंडींग फेल झाले होते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक धोके आहेत. तेथील क्रेटर म्हणजे विवर अधिक खोल आणि जास्त आहेत. येथील जमीन खूपच जाड आहे. येथे उतरण्यात यानाचा संपर्क तुटण्याचा धोका आहे. येथे पाणी आहे का ? याची पाहणी होणार आहे. पाणी असण्याची शक्यता तर चंद्रयान-1 मोहीमेत स्पष्ट झाले होते. आता तेथे पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता आहे. पाणी सापडले तर चंद्रावर हाल्ट घेऊन इतर ग्रहांवर जाता येईल. रॉकेट इंधनासाठी त्याचा वापर होईल. चंद्रयान-3 जर 23 तारखेला चंद्रावर तर भारतासाठी तो मोठा दिवस असेल.
आतापर्यंत जेवढ्या मोहीमा झाल्या त्या सर्व चंद्राच्या नियर साईटवर म्हणजे आपल्या पृथ्वीवरुन दिसणाऱ्या भागात झाल्या आता भारत चंद्रावर फार साईटवर उतरणार आहे. रशिया देखील याच भागावर उतरणार आहे. तरी रशियाने केलेला खर्च पाहता त्याच्या पेक्षा भारताची या क्षेत्रातील कामगिरी निश्चित जगाच्या दृष्टीने कौतूकाची ठरणार आहे.