Rally in POK : पीओके मध्ये तेथील नागरिकांनी शुक्रवारी शुक्रवारी त्यांच्या भागावर पाकिस्तानने कब्जा केल्याच्या विरोधात निषेध रॅली काढण्यात आली होती. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाकिस्तान प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी पीओके सोडण्याची मागणी केली. पाकिस्तानने जमीन आणि जलस्रोतांवर कब्जा केल्याबद्दल लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
पीओकेमधील घसरलेल्या जीवनमानाच्या निषेधार्थ शुक्रवारी येथील लोकांनी रॅली काढली. युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे परराष्ट्र सचिव जमील मकसूद यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे, मुझफ्फराबादमध्ये राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे अशांतता आहे. हे 1947 नाही तर 2024 आहे. उशिरा का होईना पाकिस्तानला दोन्ही भाग आपल्या ताब्यातून मुक्त करावे लागतील. यापुढे शोषण नाही आणि भ्रष्टाचार चालणार नाही.
अलीकडेच पीओकेत पाकिस्तानच्या उदासीनतेच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. निषेधादरम्यान, लोकांनी गव्हाचे पीठ खरेदी करण्यासाठी भारतातील पूंछ जिल्ह्यात जाण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान त्यांना जीवनावश्यक वस्तूही देत नसल्याचा दावा आंदोलकांनी केला होता.
पाकिस्तानमध्ये सध्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानवर मोठं कर्ज आहे. चीन कर्जाची मुदत वाढवत त्यांना दिलासा दिला असला तरी पाकिस्तान दिवाळखोरीत गेला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने अजूनही कोणाची सत्ता स्थापन होणार याबाबत अनिश्चितता आहे.
पाकिस्तानात केवळ अंडी आणि कांदाच नाही तर पाकिस्तानमध्ये चिकनचे भावही गगनाला भिडले आहेत. लाहोरमध्ये एक किलो चिकन ६१५ रुपयांना मिळते. याशिवाय दैनंदिन वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच वस्तूंवर सातत्याने महागाईचा फटका देशातील जनतेला बसत आहे. येथे दूध 213 रुपये प्रतिलिटर, तर तांदूळ 328 रुपये किलोने विकला जात आहे. फळांबद्दल बोलायचे झाले तर एक किलो सफरचंदाचा भाव २७३ रुपयांवर पोहोचला आहे, तर टोमॅटो २०० रुपये किलोने विकला जात आहे.