Truck Driver Strike | ट्रक चालकांनी संप पुकारलाय, त्यामुळे नागरिकांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात पेट्रोल टंचाईची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर दुचाकी, चारचाकीच्या मोठ्या रांगा दिसत आहेत. त्याशिवाय APMC मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक होते. त्यावरही ट्रक चालकांच्या संपामुळे मोठा परिणाम होऊ शकतो. ट्रक चालकांनी इतक थेट संपाच अस्त्र का उगारलय? केंद्र सरकारने कायद्यात असा काय बदल केलाय की, ट्रक चालकांनी थेट संपाचा मार्ग अनुसरलाय. ‘हिट एंड रन’ प्रकरणात केंद्र सरकारने कठोर नियम केलेत. त्याविरोधात ट्रांसपोर्टर्सनी संप पुकारलाय. नव्या नियमात 10 वर्ष कैद आणि दंडाची तरतूद आहे. सरकारने कायद्यात हा बदल केल्यामुळे ट्रक चालकांचा संताप झाला आहे. मध्य प्रदेशात या संपाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतोय. भोपाळच्या अनेक पेट्रोल पंपावर लोक हैराण झालेत. अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल संपलं आहे.
भोपाळमध्ये ट्रक ड्रायव्हर्सनी चक्काजाम केलय. टॅक्सी, बस, ट्रॅक्टर रोखले. त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये 2 वर्ष शिक्षेची तरतूद होती. जामिन मिळून जायचा. पण आता कायद्यात बदल केल्यामुळे ट्रक चालक आक्रमक झालेत. ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते. लोकांना आपल्या गाड्याच्या टाक्या फुल करायच्या आहेत. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी जामची स्थिती निर्माण झालीय. पेट्रोल पंप मालकांनी पंप बंद केले आहेत. पेट्रोल-डिझेलसाठी काही किलोमीटरपर्यंत रांग गेली आहे.
किती लाखापर्यंत होऊ शकतो दंड
हिट अँड रन प्रकरणात संसदेत कायदा मंजूर झालाय. त्यात बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्यास विशेष प्रावधान करण्यात आलय. कायद्यातील बदलानुसार, ड्रायव्हरने वेगात आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्यामुळे मृत्यू झाल्यास तो पोलीस आणि मॅजिस्ट्रेटला माहिती दिल्याशिवाय पळून गेल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि 7 लाख रुपयापर्यंत दंड लागू शकतो. हा कायदा दुचाकीपासून कार, ट्रक, टँकर सर्व प्रकारच्या वाहनचालकांना लागू होतो. सध्याच्या कायद्यानुसार, आयपीसीच्या कलम 279 अंतर्गत ड्रायव्हरची ओळख झाल्यानंतर कलम 304ए आणि 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला जायचा. यात दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.