Lok Sabha Election Opinion Poll | कुठल्याही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीआधी ओपनियन पोलचे आकडे समोर येतात. या ओपनियन पोलमधून त्या राज्यात कुठल्या पक्षाच सरकार येणार? कोण किती जागा जिंकणार? जनमताचा कल कुठल्या बाजूला आहे, ते स्पष्ट होतं. प्रत्येकवेळी ओपनियन पोल अचूक असतातच असं नाही. पण त्यातून साधारण चित्र, मतदारांचा मूड दिसून येतो. लोकसभा निवडणूक ही सगळ्या देशाची असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या ओपनियन पोलकडे विशेष लक्ष असतं. त्यातून देशाचा मूड कळतो. TV9 ने सुद्धा लोकसभा निवडणुकीआधी असाच ओपिनियन पोल घेतलाय. मतदार राजाने या ओपिनयन पोलमधून आपली पसंती कोणाला आहे? ते स्पष्ट केलय.
पोलची सँपल साइज सर्वात जास्त 20 लाख आहे. PEOPLE’S INSIGHT, POLSTRAT आणि TV9 चा हा
विश्वसनीय गॅरेंटीवाला ओपिनियन पोल आहे.
देशतील सर्व 543 मतदारसंघाचा हा ओपिनियन पोल आहे.
एक लोकसभा मतदारसंघातंर्गत सर्व विधानसभेचे आकडे आहेत.
प्रत्येक वर्गाच्या सँपल साइजचा ओपिनियन पोल आहे.
कुठल्या जागांवर भाजपाची पकड ?
देशात एकूण 543 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात 95 जागांवर भाजपाची स्थिती मजबूत आहे. 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या सर्व 95 लोकसभा जागांवर भाजपाने विजय मिळवलेला. 173 जागा अशा आहेत, ज्या भाजपाने 2009, 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत 2 वेळा जिंकल्या आहेत. 2009, 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत 76 अशा जागा आहेत, जिथे भाजपाला फक्त एकदा विजय मिळालाय. या 76 जागा 2024 मध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा आहेत.
काँग्रेस किती जागांवर मजबूत?
देशात लोकसभेच्या अशा 199 जागा आहेत, जिथे मागच्या 3 लोकसभा निवडणुकीत एकदाही भाजपाचा उमेदवार जिंकू शकलेला नाहीय. लोकसभेतील एकूण 17 जागांवर काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. मागच्या 3 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एकदाही या 17 जागा गमावलेल्या नाहीत. 34 अशा जागा आहेत, जिथे काँग्रेसने 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत कमीत कमी 2 वेळी विजय मिळवला आहे. या जागा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.