नोएडा : दारु पिण्यास पत्नीने विरोध केला म्हणून दारुड्या नवऱ्या(Husband)ने गळा आवळून पत्नी(Wife)ची हत्या केल्याची घटना नोएडातील कोतवाली सेक्टर 142 मधील शहदरा गावात घडली आहे. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पंख्याला लटककवून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. शारदा असे मयत महिलेचे नाव असून अनिल उर्फ सोनू असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या माहेरच्या लोकांनी कोतवाली पोलिसात हत्येची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सोमवारी एक्स्प्रेस वे जवळ पोलिसांनी आरोपीला अटक केले. (Wife murdered by husband for opposing drinking in Noida, Accuse arrest)
मयत शारदा आणि अनिल यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ती पतीसोबत शहदरा गावात राहत होती. अनिल हा एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची नोकरी सुटली होती. त्यामुळे सध्या तो बेरोजगार होता. अनिलला दारुचे व्यसन होते. नोकरी सुटल्यानंतर अनिल वारंवार लोकांकडून दारुसाठी उधार पैसे घ्यायचा. अनिल आणि शारदा यांना 12 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी अशी दोन मुले आहेत. अनिल दारुडा असल्याने ही दोन्ही मुलांना शारदाने हरिद्वार येथे आपल्या बहिणीकडे ठेवले होते.
नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीही अनिल दारु पित बसला होता. पत्नी शारदाने त्याला दारु पिण्यास विरोध केला. याचाच राग आल्याने अनिलने शालच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिला ठार मारले. पत्नीचा मृत्यू आत्महत्या दर्शवण्यासाठी आरोपीने त्याच शालने तिला पंख्याला लटकवले. शारदाच्या मृत्यूची बातमी मिळताच तिचे नातेवाईक शहदरा येथे पोचले. तेथे पोहचल्यानंतर शारदाच्या नातेवाईकांना अनिलच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात मयत महिलेच्या भावाने कोतवाली सेक्टर 142 पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत घेऊन कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात शालही जप्त केली आहे.
घरगुती वादातून सुनेने सासूवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी यवतमाळमधील आर्णी शहरात घडली. आशाबाई किसनराव पोरजवार असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आशाबाई या आपला थोरला मुलगा अरविंदसह भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. नेहमाप्रमाणे सोमवारी आशाबाईचा मुलगा अरविंद आणि एक हमाल बाहेर भाजी विक्रीसाठी जाण्याची तयारी करीत होते. तर आशाबाई आणि सून सरोज घरात होत्या. यावेळी अचानक गोळीचा आवाज आल्याने मुलाने आणि शेजाऱ्याने घरात जाऊन पाहिले असता आशाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांना तात्काळ यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असून पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. (Wife murdered by husband for opposing drinking in Noida, Accuse arrest)
इतर बातम्या
Nashik | स्कूल बस जळून खाक; विद्यार्थ्यांसह 2 शिक्षिका सुखरूप, कशी घडली अनर्थकारी घटना?
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचं परमबीर सिंग यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र चांदीवाल आयोगाकडे सादर