नवी दिल्ली – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचे मुंबईशी संबंधित अनेक प्रकल्प आता नव्याने कार्यान्वित होत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोध असलेले अनेक प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रामी प्रोजेक्ट असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा (Bullet train)मार्गही आता मोकळा झाला आहे. पंतप्रधानांनी घोषणा केलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. केंद्र सरकारने मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाच्या हालचालांनी सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने मुंबईतील बुलेट ट्रेनसाठीचे रेल्वे स्टेशन, बोगदे, डिझाईन्स याासाठीची टेंडर प्रक्रिया (tenders)सुरु केली असून. त्याचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. याबाबतची जाहीरात केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
The Government of India invites bids for the design and construction of the Mumbai Underground station and tunnels for the bullet train project. pic.twitter.com/d3pI7Q63gQ
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 22, 2022
बीकेसीत बुलेट ट्रेनचे मुख्य स्टेशन होणार असल्याची शक्यता या टेंडर प्रक्रियेवरुन दिसते आहे. तसेच हे मुख्य स्टेशन बीकेसीत भुयारी असणार असून, त्या स्टेशनचे डिझाईन, बोगदे याच्या बाबतचे टेंडर मागवण्यात आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने ही टेंडर्स मागवण्यात आली आहेत. आज 22 जुलैला याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, 13 ऑक्टोबरपासून लिलावासाठी कागदपत्रे स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत ही टेंडर्स स्वीकारण्यात येतील. म्हणजेच येत्या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई – अहमादाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर सुमारे 1.10 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यातील 81 टक्के रक्कम ही जपान आंतरराष्ट्रीय एजेंसीतून मिळणार आहे. अहमदाबाद-मुंबई हे 520 किलोमीटरचे अंतर बुलेट ट्रेन केवळ 3 तासात पूर्ण करु शकणार आहे. यासाठी तयार करण्यात येत असलेल्या कॉरिडॉरमध्ये प्रतिताशी 320 किमी वेगाने ही ट्रेन धावणार आहे. या दोन्ही शहरांमध्ये 12 स्टेशन्सची उभारणी करण्यात येणार आहे. जूनपर्यंत यातील 61 किमी मार्गावर खांबांची उभारणी करण्यात आली असून, 150 किलोमीटरवर काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती जूनमध्ये अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. या 520 किलोमीटर मार्गावरील 352 किमीचा भाग हा गुजरातमध्ये दादरा आणि नगर हवेली भागात येतो. या परिसरात डिसेंबर 2020 पासून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. गुजरातमध्येत सूरत ते बिलिमोरा ही पहिली ट्रेन 2026 साली धावेल असेही रेल्वेमंत्र्यांनी याआधी सांगितलेले आहे.
2015 साली बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झालेली आहे. राज्यात मविआ सरकारने याला विरोध केला होता. तोपर्यंत 81 टक्के भूमी अधिग्रहण पार पडले असल्याची माहिती आहे. आता मात्र शिंदे-भाजपा सरकार आल्यानंतर हा प्रकल्प गती घेणार असे दिसते आहे. आरेतील मेट्रोच्या कार शेडचा मार्ग मोकळा झाल्यानंतर, याच परिसरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्गही पर्यावरणीय दृष्ट्या मोकळा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.