नवी दिल्ली – बिहारमध्ये नुकतीच भाजपाची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar)यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारी दिल्लीत पोहचले. दिल्लीत आाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय चर्चा झाली हे समोर आले नसले तरी, 2014 च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीतीच्या तयारीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. याच निवडणुकांच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. नितीश दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी भाजपाविरोधात (BJP) विरोधकांची एकजूट करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Bihar CM Nitish Kumar met Congress MP Rahul Gandhi, in Delhi pic.twitter.com/y6Sw4yLqXx
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) September 5, 2022
नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्या भएटीनंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. यात या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मीत हास्य दिसते आहे. याचा अर्थ असा की नितीश कुमार जो प्लॅन घेऊन दिल्लीत आले होते तो सफल झाला असल्याची चर्चा आहे. नितीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर सक्रिय होण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर काँग्रेसला बिहारमध्ये नितीश कुमार यांची गरज आहे. या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीवरुन ही भेट सकारात्मक झाली असल्याचे सांगण्यात येते आहे.
If the opposition will get united, then a good atmosphere will be created. I have no desire and no aspiration (to become prime minister): Bihar Chief Minister Nitish Kumar, in Delhi pic.twitter.com/GQW0jjf6oQ
— ANI (@ANI) September 5, 2022
राहुल गांधी यांना भेटण्यापूर्वी नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीबद्दल मोठे विधान केले आहे. पंतप्रधान होण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी एकत्र येऊन भाजपाशी लढा द्यावा, हीच आपली इच्छा असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. जर विरोधक एकत्र आले तर भविष्यासाठी हे चांगले असेल, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.
राहुल गांधी आणि नितीश कुमार यांच्या या भेटीकडे भाजपा नेतृत्वाचेही लक्ष असणार. दोन्ही नेत्यांच्या या स्मित हास्यातील फोटोमुळे भाजपा पक्षश्रेष्ठींच्या चिंतेत थोडी भर नक्की पडली असणार, असे सांगण्यात येते आहे. नितीशकुमार महाआघाडीत गेल्याने, भाजपासमोर थोडी चिंता वाढलेली दिसते आहे. काँग्रेस आणि नितीशकुमार यांच्यातील ही जवळीक किती परिणामकारक असेल हे येणारा काळच ठरवणार आहे. नितीश कुमार आणि त्यांची पार्टी आगामी 2024 च्या तयारीला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत संध्याकाळी येण्यापूर्वी त्यांनी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचीही भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही समान विचारधारेचे आहोत, सगळ्या बाबींवर आमचे एकमत आहे. या भेटीनंतर विरोधकांच्या एकजुटीसाठी तीन दिवसांच्या दौऱ्यावर ते दिल्लीत पोहचले आहेत.