मुंबई : दारु (liquor) पिणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण बियर (beer) आणि दारुच्या दरात वाढ होणार आहे. त्याचबरोबर दुकानाच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. ही दरवाढ उत्पादन शुल्क (Excise duty) वाढवल्यामुळे होणार आहे. विशेष म्हणजे त्या राज्यातल्या बार असोसिएशनने दुकानाची वेळ वाढण्यासाठी विनंती केली आहे.
उत्तर प्रदेश या राज्यात नवा उत्पादन शुल्क लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथं बिअर आणि दारुचे दर वाढण्याची शक्यता आहे. यावेळी राज्य सरकार नवा टॅक्स लागू करणार आहे.
मागच्या दहा वर्षात दारुच्या दुकानाचा खर्च अधिक वाढला आहे. सगळ्या बाबतीत खर्च वाढला असल्यामुळे उत्पादन शुल्कमध्ये आणि इतर टॅक्समध्ये आम्हाला टॅक्स कमी बसावा असं पत्र त्यांनी दिलं आहे. त्यामुळे दुकानाच्या वेळेत एक तास वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे.
युपीमध्ये कोरोनाच्या काळात सरकारने दारु वीस रुपयांनी स्वस्त केली होती. परंतु आता दारुच्या दरात दोन वर्षांनी वाढ होणार आहे. त्यामुळे अधिक वाढ होईल असा अंदाज आहे.