टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची मुलाखत पत्रकार पद्मजा जोशी यांनी घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफने ( जशास तसे शुल्क ) जगभरात खळबळ उडाली आहे. २ एप्रिल ही सीमारेषा दिली होती. यावर भारताने या रणनीती आखली आहे.यावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान मैत्री, एकमेकांबरोबर आदर आणि सन्मान आणि सद् भाव खूपच मजबूत आहे.जेव्हा आम्ही दोघे भेटतो तेव्हा एक फोर्स मल्टीप्लायर होऊन जातो. कालच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते की पंतप्रधान मोदी आम्ही घनिष्ठ मित्र मानतो.
आज भारत सर्वाधिक ग्रॅज्युएट तयार करीत आहे. यातील ४३ टक्के महिला आहे, तरुणी आहेत. भारतात ज्वलंत मीडिया, स्वतंत्र न्यायालये आहेत. भारताची ताकद जगातील अनेक देश मानतात आणि कबूलीही देतात. याच कारणांनी युरोपियन युनियन, गल्फमधील देश भारताकडे आश्वासक नजरेने पाहातात. असे म्हटले जात आहे की सुमारे २३ अब्ज डॉलरच्या आयातीवरील टेरिफ हटविला जाणार आहे. युरोपातील चार देश, ऑस्ट्रेलिया यांच्याशी आम्ही व्यापार करार केले आहेत. भारत आणि अमेरिका दोन्ही आपल्या हिताप्रमाणे काम करीत आहेत.
भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करीत आहेत. भारताच्या हिताचे असेल तेच होणार आहे.हे दोन्हींसाठी फायद्याचे असेल. टाळ कधी एका हाताने वाजते का ? एकतर्फी फायदा दीर्घकाळ चालू शकत नाही. अमेरिका आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणताही फरक नाही. आम्ही एक ओर एक मिलेकी ग्यारह होणार आहोत. एकावेळी आपण सर्वांबरोबर सारखेच अंतर राखायचो. आता आपण मैत्री करीत आहोत. कनाडाशी भारताच्या होणाऱ्या व्यापारी संबंधा संदर्भात विचारले असता त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.हीच योग्य आहे असे गोयल यांनी सांगितले.
आपल्या लोकशाहीत कायद्याचे राज्य आहे. कुणाल कामरा याला राजकीय तज्ज्ञ बोलणे योग्य होणार नाही. कोणाला गद्दार म्हणणे योग्य नाही. जर उद्या जर अशी सुट दिली गेली तर भारताच्या देवींना ज्याप्रकारे प्रदर्शित केले जाते होते ते योग्य होते का?. त्यांना मोकळीक देणे योग्य होणार नाही. कोणत्याही न्यायाधीशांवर टीका टीप्पणी केली जाऊ शकते. मला नाही वाटत कोणत्याही देशाचा कायदा याचा स्वीकार करेल असेही पियुष गोयल यांनी सांगितले.