नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे. आजच्या सत्ता संमेलन या कॉन्क्लेव्हमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्याच नव्हे तर चौथ्या टर्मचीही भविष्यवाणी केली. मोदी तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान होणार आहेतच. पण चौथ्या टर्मलाही पंतप्रधान होणार आहेत. मी जेव्हा भविष्यवाणी करतो, तेव्हा ती खरीच ठरते. ती खोटी ठरत नाही, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
भाजपला 2024मध्ये किती जागा मिळतील? तुमची भविष्यवाणी काय म्हणतेय? असा सवाल राजनाथ सिंह यांना करण्यात आला. त्यावर राजनाथ सिंह यांनी थेट उत्तर दिलं. भाजपला यावेळी 370 जागा मिळतील. तर एनडीए 400 च्या पुढे जागा मिळवेल. भविष्यवाणी हीच आहे. अजून एक भविष्यवाणी आहे. आमची भविष्यवाणी चुकत नाही. तिसऱ्या टर्ममध्ये मोदी येत आहेतच. पण चौथ्या टर्ममध्येही मोदी येणार आहेत, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.
देशात करिश्मा झाला आहे. आर्थिक आघाडीवर चमत्कार झाला आहे. लोकांचा मोदींवर भरोसा आहे. आर्थिक क्षेत्रात ज्या प्रकारे काम झालं आहे, ते जबरदस्त आहे. कोरोनाच्या काळात आपली इकॉनॉमी सांभाळणं ही छोटी गोष्ट नव्हती. आमच्या इकॉनॉमीची ग्रोथ रेट वाढत आहे. जगातील कोणत्या देशाच्या इकॉनॉमीचा इतका झपाट्याने ग्रोथ रेट वाढलेला नाही. जगातील सर्वात फास्टेट ग्रोईंग इकोनॉमी भारताची आहे. आत आपण चार ट्रिलियन इकॉनॉमी झाला आहोत. मी म्हणत नाही, तर मार्गन स्टेनली म्हणत आहे. भारताला टॉप थ्री इकॉनॉमी आणण्यासाठी कोणी रोखू शकत नाहीत. फायनान्शिअल फर्मच सांगत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अग्नीवीर योजनेवर होणाऱ्या आरोपांवरही त्यांनी टीका केली. आर्मीमध्ये तरुणाई दिसू नये का? लष्करात युथफुलनेस येण्यासाठी तरुणांचा सहभाग असावा. त्यांची टक्केवारी वाढावी म्हणून अग्नीवीर योजना सुरू केली आहे. 19 ते 23 वर्षाचे तरुण जे सीमेवर जेवढी भूमिका निभावू शकतात तेवडी कामगिरी 40-45 वर्षाचे जवान नाही निभावू शकत. ज्यादा श्रम करण्याची, जोखीम उचलण्याची भावना तरुणांमध्ये असते. त्यामुळेच लष्कराला युथफूलनेस आणण्यासाठीच अग्नीवीर योजना आणली आहे. चार वर्षानंतर रिटायर झाल्यावर त्यांना आरक्षण ठेवलं आहे. कुठे तरी नोकरी मिळावी याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना उद्योगासाठी काही रक्कमही देत आहोत. त्यांनी घरी बसावं असं नाही. अजून यात काही सुधारणा करण्याची गरज असेल तर करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.