नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात सहभागी झाली. त्यांनी या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर मोकळेपणाने उत्तर दिलं. ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी ईडीच्या कारवाया या किती टक्के राजकीय नेत्यांवर केल्या जातात याबाबतचा थेट आकडाच सांगितला. “आमची भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम आहे. काँग्रेसच्या खासदाराच्या घरातून कोरोडो रुपये मिळाले आणि कारवाई करू नका म्हटलं तर कसं चालेल. तृणमूलच्या मंत्र्याकडे मशीनने मोजावे लागतील एवढे पैसे मिळतील तर कारवाई करू नये का. ईडीने जेवढ्या कारवाया केल्या. त्यातील पाच टक्के राजकारणी आहेत. तर ९५ टक्के इतर लोक आहे. पण अफवा पसरवली जात आहे. जे लोक भ्रष्टाचार करत आहेत, तेच लोक हा भ्रम फैलावत आहेत”, असं अमित शाह म्हणाले.
“भारतातील सर्वात चांगले वकील काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी कोर्टात जाऊन लढलं पाहिजे. एजन्सीच्या कारवाईबाबत काँग्रेसने तरी बोलू नये. इंदिरा गांधी यांनी कारणाशिवाय लोकांना आतमध्ये टाकलं होतं. वर्तमानपत्रावरही बंदी घातली आहे”, असं शाह म्हणाले.
“भाजपमध्ये कोणी आले असले तरी कुणाचीही केस भाजपने मागे घेतली नाही. काँग्रेसने दहा वर्षात भ्रष्टाचार केला होता. त्यांच्या सरकारने सीबीआय चौकशी लावली होती. कशासाठी चौकशी लावली होती. कॉमनवेल्थवर कुणी चौकशी केली तर काँग्रेसने केली. काँग्रेसने त्यांच्या सरकारात त्यांच्याच विरोधात ४० केसेसमध्ये चौकश्या लावल्या होत्या. तेव्हा कुणाचं सरकार होतं. ईडीने जे लाखो रुपये जप्त केलं आहे, तो ब्लॅक मोहिमचा भाग आहे. ९५ टक्के काळा पैसा इतरांचा आहे. तर ५ टक्के पैसा फक्त राजकारणाचा आहे”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.
यावेळी अमित शाह यांनी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. “रिलीजिअस मायनॉरिटीला नागरिकत्व देण्याचं नेहरूचं स्वप्न होतं. आम्ही ते पूर्ण केलं. आम्ही काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. तीस वर्षानंतर आम्ही नवं शैक्षणिक धोरण आणलं. ४० वर्षापासून महिलांच्या आरक्षणाची चर्चा होती. कोणी देत नव्हतं. आम्ही महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. त्यांचा धोरणांमध्ये सहभाग आणला. न्याय संहिता, नागरिक संहिता, भारतीय साक्ष संहिता आम्ही इंग्रजांचे कायदे रद्द केले. राम मंदिर उभारलं”, असं अमित शाह म्हणाले.