संसदेच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शुक्रवारी राज्यसभेत विरोधक नीट परीक्षेतील गैरव्यावहारावरुन निदर्शनं करत होते. यावेळी काँग्रेसचे खासदार फुलो देवी नेताम यांची प्रकृती खालावलीये. फुलो देवी यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. सभागृहात निदर्शने करत असताना ही घटना घडली.
गदारोळ सुरु असताना फुलो देवी यांची तब्येत बिघडली. यानंतर सहकारी खासदारांनी फुलो देवी यांना सांभाळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. फुलो देवी यांना संसदेच्या संकुलात नेल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवालही पुढे बसलेल्या दिसत आहेत.
फुलो देवी नेताम या छत्तीसगडमधील बस्तर भागातील कोंडागाव येथील रहिवासी आहेत. त्या काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. छत्तीसगडच्या त्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षाही आहेत. 14 सप्टेंबर 2020 रोजी त्या छत्तीसगडमधून काँग्रेसच्या सदस्या म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या.
#WATCH | Congress party’s Rajya Sabha MP Phulo Devi Netam being taken away in an ambulance from Parliament after she felt dizzy and fell. She was protesting in the Well of of the House over NEET issue when the incident happened. She is being taken to RML hospital. pic.twitter.com/ljyXgCfuMA
— ANI (@ANI) June 28, 2024
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीने फुलो देवी नेताम यांच्यासह १२ विरोधी खासदारांना सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल दोषी ठरवले होते. गुरुवारी या सदस्यांना भविष्यात असे वर्तन न करण्याचा इशारा देण्यात आला. गुरुवारी विशेषाधिकार समितीने राज्यसभेत अहवाल सादर केला. आप नेते संजय सिंह, शक्तीसिंह गोहिल, सुशील कुमार गुप्ता, संदीप कुमार पाठक, सय्यद नासिर हुसेन, फुलो देवी नेताम, जेबी माथेर हिशाम, रंजीत रंजन आणि इम्रान प्रतापगढ़ी यांना भविष्यात अशा गैरवर्तनात सहभागी होण्यापासून रोखले पाहिजे, असे समितीने अहवालात म्हटले आहे.