कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा; मोदींचं देशवासियांना आवाहन

| Updated on: Oct 22, 2021 | 10:45 AM

देशाने 100 कोटी व्हॅक्सिनेशनचा टप्पा पार केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. सुरक्षेचं कवच कितीही उत्तम असेल. (World will now see India as more safe from Covid: Narendra Modi)

कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा; मोदींचं देशवासियांना आवाहन
नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली: देशाने 100 कोटी व्हॅक्सिनेशनचा टप्पा पार केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. सुरक्षेचं कवच कितीही उत्तम असेल, कितीही आधुनिक असेल, सुरक्षेची कितीही हमी असेल तरीही कोरोनाचं युद्ध जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत शस्त्र टाकू नका. मास्क घालूनच घराबाहेर पडा. सण-उत्सवाच्या काळात अधिक सतर्क राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशवासियांना हे आवाहन केलं. 21 ऑक्टोबर 2021 हा दिवस इतिहासात नोंदला गेला आहे. भारताने काल लसींचे 100 कोटी डोस देण्याचा टप्पा पार केला. देशाकडे गेल्या 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या जागतिक साथीला सामोरे जाण्यासाठी लसींच्या 100 कोटी डोसची मजबूत संरक्षक ढाल आहे. ही भारताची, भारतातील प्रत्येक नागरिकाची मोठी उपलब्धी आहे, असं मोदी म्हणाले.

लसीकरणात भेदभाव केला नाही

कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोणतंही व्हीआयपी कल्चर घुसू दिलं नाही. यामध्ये सगळ्या देशवासियांचे प्रयत्न होते, असं सांगतानाच मेड इन इंडियाची ताकद सर्वांत मोठी, हे देशाने पुन्हा एकदा दाखवून दिलं. जोपर्यंत युद्ध सुरु आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेऊ नका, मास्क वापरत राहा. शूज घातल्याशिवाय जसे आपण घराबाहेर पडत नाही. तसेच मास्क घातल्याशिवया घराबाहेर पडू नका, असं आवाहन ही मोदींनी केलं.

महामारीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले

100 कोटी व्हॅक्सिन डोस हा केवळ आकडा नाही. तर देशाच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब आहे. नव्या अध्यायाची सुरुवात आहे. नव्या भारताची सुरुवात आहे. अवघड लक्ष्य पूर्ण करणाऱ्या भारताचं लक्ष्य आहे. भारताने 100 कोटींच लक्ष पूर्ण केलं आहे. त्याची इतर देशाशी तुलना केली जात आहे. त्याचं कौतुकही केलं जात आहे. आपण याची सुरुवात कशी केली हे महत्वाचं आहे. व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात इतर देशांचा हातखंडा होता. आपणही याच देशांवर अवलंबून होतो. त्यामुळे भारतही त्यांच्यावर अवलंबून होता. महामारी आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. भारत कोरोना व्हॅक्सिन तयार करेल का? भारत आपल्या देशातील लोकांची काळजी कशी घेणार? सर्वांना लस देईल का असे प्रश्न निर्माण झाले होते. पण भारताने सर्वांना लस दिली. मोफत दिली. कोणतीही रक्कम घेतली नाही, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

PM Modi Speech LIVE | लसीकरणाने देशात मजबूत सुरक्षा कवच, नव्या भारताचं जगाला दर्शन, देशवासियांचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

100 कोटी लोकांचे लसीकरण झाले. आता भारत कोरोनापासून सुरक्षित आहे का?

काश्मीरमधील बिहारी मजुरांच्या सुरक्षेसाठी त्यांना AK-47 द्या, भाजप आमदाराची मागणी
(World will now see India as more safe from Covid: Narendra Modi)