टीवी9 नेटवर्कचा वार्षिक कार्यक्रम WITT ग्लोबल समिटमध्ये हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम शुक्रवारी आली. दक्षिणात्य चित्रपट अभिनेते तथा निर्माते विजय देवरकोंडा सोबत अभिनेत्री यामी गौतमही आली. यादरम्यान TV9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी विजय देवरकोंडा आणि यामी गौतम यांचे स्वागत केले. कार्यक्रमात यामी गौतम हिने तिच्या करिअरबद्दल सांगितले. हिमाचल प्रदेश ते मायानगरी हा तिचा प्रवास कसा होता? याबद्दल माहिती दिली.
कुणाल कामरा याने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत तयार केले आहे. त्या प्रश्नावर बोलताना यामी गौतम म्हणाली, मी तो व्हिडीओ पाहिला नाही. मी चित्रपटांचे चित्रीकरण करते. मी करेंट अफेयर्समध्ये काय होते ते पाहते. पण सोशल मीडियावर काय होते, ते मला माहीत नाही. मी ते पाहत नाही. पण तुम्ही म्हणताय तर मी तो व्हिडिओ पाहिल. संबंधित ऑथोरिटी त्यावर चौकशी करेल. माझा चौकशीवर विश्वास आहे.
नागरिक म्हणून असे वाटते की, आम्हाला आधी आपला हक्क आठवतो. पण मी राज्यशास्त्रात वाचले होते की हक्काबरोबर आपली कर्तव्यही असतात. या दोन्ही गोष्टी कुठे ना कुठे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यात बॅलन्स ठेवला गेला पाहिजे. जेव्हा तुम्ही पब्लिक मंचावर असतात प्रत्येकाची एक भूमिका असते. पण इंटरनेट सर्वांसाठी ओपन आहे. त्यात सेंसेशनल असेल ते लगेच पोहोचते. चांगल्या गोष्टी जात नाही, असे यामी गौतम म्हणाली.
बॉलीवूडमधील गटबाजी राजकीय विचारसरणीमुळे आहे का? या प्रश्नावर अभिनेत्री यामी गौतम म्हणाली, प्रत्येकाची स्वतःची राजकीय विचारधारा असते. मी या देशाचा नागरिक आहे. एक अभिनेता म्हणून मी निःपक्षपातीपणे काम करतो. प्रतिभेवर विश्वास असेल तर यश मिळेल. मला चांगले काम करायचे आहे, हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट होते.