उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा इतिहासकारांवर निशाणा साधला आहे. योगी म्हणाले की, इतिहासकारांनी अशोक किंवा चंद्रगुप्त मौर्यासारख्यांना महान म्हटले नाही, तर चंद्रगुप्त मौर्यांकडून पराभूत झालेल्या अलेक्झांडरला महान म्हटले आहे. हा देशाचा विश्वासघात आहे आणि देशाची किती फसवणूक झाली आहे, हे जनतेने समजून घेतले पाहिजे. इतिहासकार या सर्व मुद्द्यांवर मौन बाळगून आहेत. मुख्यमंत्री योगी सपावर आरोप करत म्हणाले की, आज विरोधक देशाची उभारणी करणाऱ्या सरदार पटेल यांचा अपमान करत आहेत आणि जिन्नांना मात्र पाठिंबा देत आहेत. (Yogi Aadityanath slams historians for praising Alexander and points to Samajwadi party that support Jinnah means support to taliban)
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अलीकडे जिन्ना, गांधी आणि पटेल एकाच संस्थेतून बाहेर पडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे म्हटले होते. यानंतर राज्यात जिन्नांबद्दल वाद सुरू झाला. भाजपच नाही तर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आणि म्हणाले की, आजच्या भारतामध्ये जिन्नांची कोणतीही भूमिका नाही.
इतिहास ने अशोक या चंद्रगुप्त मौर्य को महान नहीं बताया बल्कि चंद्रगुप्त मौर्य से हारने वाले सिकंदर को महान बताया, देश के साथ कितना धोखा हुआ है। इतिहासकार इन सब मुद्दों पर मौन हैं, अगर सच्चाई भारतवासियों के मन में आ जाएगी तो समाज और देश खड़ा हो जाएगा: लखनऊ में योगी आदित्यनाथ, UP CM pic.twitter.com/ItcnkxGDTK
— ANI_HindiNews (@AHindinews) November 14, 2021
विरोधी पक्षांवर, विशेषत: समाजवादी पक्षावर निशाणा साधत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, जे आज जिन्नांना पाठिंबा देत आहेत ते एकप्रकारे तालिबानलाही पाठिंबा देत आहेत. योगी म्हणाले की, आज विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही का जे त्यांना सरदार पटेलांचा अपमान करायचा आहे. राष्ट्रीय नायक सरदार पटेल एका बाजूला आणि राष्ट्र तोडणारे जिना दुसऱ्या बाजूला आहेत. अखिलेश यादव यांची खिल्ली उडवत योगी म्हणाले की, ते जीन्नांना पाठिंबा देतात आणि आम्ही सरदार पटेल यांना पाठिंबा देतो. फाळणीची याप्रकारे चर्चा करणारे एकप्रकारे तालिबानीचे थेट समर्थन करतात, असा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा-
VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थनhttps://t.co/FDx5HO20cf#vikramgokhale | #shivsena | #bjp | #mahavikasaghadi | #kanganaranuat
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021