लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath)आणि त्यांचा संताप काही नवीन नाही. अनेकवेळा योगी सार्वजनिक ठिकाणी कोणावर तरी रागावले आहेत. नुकत्याच झालेल्या अशाच एका घटनेत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh BJP) भाजप नेते विभ्रत चंद्र कौशिक यांच्यावर सर्वांसमोर ओरडले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral video)आहे. ही घटना 29 नोव्हेंबरची आहे, जेव्हा योगी बसगावला एका क्रीडा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. विभ्रत कौशिक गोरखपूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे राज्यमंत्री दर्जा देखील आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विभ्रत कौशिक योगी आदित्यनाथ यांच्या कानात काहीतरी सांगण्यासाठी गेले होते. पण, योगी त्यांचावर भडकले आणि निघून जाण्यास सांगितले. विभ्रत कौशिक हे उत्तर प्रदेश भाजपमधील सक्रिय भाजप नेते आहेत. सध्या ते उत्तर प्रदेश युवा कल्याण परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे राज्यमंत्री दर्जा आहे.
कभी कभार भौकाल बनाने के चक्कर मे बेइज्जती हो जाती है। #गोरखपुर में नजदीकी दिखाने के चक्कर में #भाजपा नेता विभ्राट चंद #कौशिक सार्वजनिक रूप से पा गए फटकार । pic.twitter.com/USR0utym3W
— Vivek N Mishra (@viveknmishra_) December 1, 2021
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी टीका करण्याऐवजी या घटनेची खिल्ली उडवली. काही म्हणाले, “बिचार विभ्रत उगाच फटकरे खावे लागे,” तर काही म्हणाले “विभ्रत गोरखपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्यापासून त्याचा आदर केला जातो आणि तेव्हापासून तो भाजपसोबत आहेत. विभ्रत हा त्या काही भाजप नेत्यांपैकी आहे, ज्यानी उच्च शिक्षण घेतले आहे.”
हमारे समय गोरखपुर यूनिवर्सिटी के अध्यक्ष रहे विभ्राट भाई भाजपा में उसी ज़माने से जुड़े हैं और शायद गिने चुने पढ़े लिखों में से है।
यह अपमान देखकर बुरा लगा। https://t.co/vC7iAYwwpy
— Ashok Kumar Pandey अशोक اشوک (@Ashok_Kashmir) December 1, 2021
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध कार्यक्रम, उद्घाटन कार्यक्रमांना सतत हजेरी लावत आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये होणार्या उत्तर प्रदेश निवडणुकीचा प्रचाराचं वातावरण चांगलच तापलं आहे आणि सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत. यावेळी योगी सरकारला अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडून जोरदार लढा दिला जात आहे.
इतर बातम्या