प्रयागराज – प्रयागराजला १० जून रोजी झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड जावेद याचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेत जावेदचे घर तोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंसाचाराचा मुख्य आरोपी जावेद मोहम्मद याच्या घराची रविवारी सकाळी पोलिसांनी छापेमारी केली. त्याच्या घरातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आल्या आहेत. यासह काडतूसं आणि काही कागदपत्रंही मिळाली आहेत. प्रशासनाने चारे चार तासांत बुलडोझर आणि पोकलेनच्या सहाय्याने जावेदचे घर पाडले. जावेद याचे गौसनगर परिसरात अलिशान घर होते, ते पूर्णपणे तोडण्यात आले. घर तोडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या वस्तू बाहेर नेण्याची परावनगी देण्यात आली होती. या हिंसाचार प्रकरणात अटाला मशिदीच्या मौलानांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Demolition drive at the “illegally constructed” residence of Prayagraj violence accused Javed Ahmed continues in Prayagraj. pic.twitter.com/s4etc8Vz25
हे सुद्धा वाचा— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 12, 2022
मास्टरमाईंड जावेदचे घर तोडण्यापूर्वी या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. घराच्या बाहेर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका उभ्या होत्या. पोलिसांना या घरात काही झेंडेही सापडले आहेत. या परिसरात सुरक्षेसाठी १० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला ते ठिकाण जावेदच्या घरापासून १० किमी अंतरावर होते. या हिंसाचारानंतर ३०४ जणांना अटक करण्यात आली आहे. अजून ३६ समाजकंटकांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात येणार आहे.
प्रयागराजनंतर, हिंसाचार झालेल्या उ. प्रदेशातील इतर शहरातही हीच कारवाई होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पोलीस बुडडोझरसह आरोपींच्या घरांच्या परिसरात फिरत आहेत. अनेक शहरातील आरोपी हे घर सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या घरात सध्या केवळ महिलाच आहेत. अनेक घरांना कुलूप लावून सगळेच बाहेर पळून गेल्याचीही माहिती आहे.
दरम्यान मोहम्मद पैंगबर वादग्रस्त प्रकरणी प्रयागराजमधून सुरु झालेला हिंसाचार अद्यापही देशभरात सुरु आहे. प. बंगालमध्ये नादियातील एका रेल्वे स्टेशनवर समाजकंटकांनी हल्ला केला. त्यावेळी स्टेशनवरील ट्रेनमध्ये तोडफोड करण्यात आली. प. बंगालमध्ये हिंसाचार झालेल्या क्षेत्रात दौरा करण्यासाठी निघालेल्या भआजपाच्या शुभेंदु अधिकारी यांना पोलिसांनी रोखले आहे.