आता NET-PhD शिवाय देखील विद्यापीठात कुलगुरू होता येणार,पाहा UGC चा नवीन नियम काय?

| Updated on: Jan 07, 2025 | 3:29 PM

युजीसीने नवीन अधिनियम २०२५ चा मसुदा सादर केला आहे. या नवीन नियमाप्रमाणे आता ॲकॅडमिक क्वॉलीफिकेशन नसलेले लोक देखील युनिव्हर्सिटीत कुलगुरू पदासाठी अर्ज करु शकणार आहेत.

आता NET-PhD शिवाय देखील विद्यापीठात कुलगुरू होता येणार,पाहा UGC चा नवीन नियम काय?
university grants commission
Follow us on

UGC New Regulations 2025 : विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन ‘युजीसी अधिनियम २०२५’ चा मुसदा सादर केला आहे. या नव्या युजीसी नियमानुसार आता युनिव्हर्सिटीत आता नॉन ॲकॅडमीक क्षेत्रातील लोक देखील कुलगुरू बनू शकणार आहेत. तसेच योग विद्येसह विविध व्यवसायात पारंगत असणारे लोक थेट सहायक प्राध्यापक बनू शकणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिनियम २०२५ चा ड्राफ्ट जारी केला आहे. हा नवा ड्राफ्ट युजीसी अधिनियम २०२५ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेबसाईट ugc.gov.in वर उपलब्ध आहे. हा ड्राफ्ट जनतेसाठी खुला आहे. नवीन कायद्याच्या मसुदा काल ६ जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केला होता.

नवीन ड्राफ्टच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ७० वयोगटापर्यंतच्या व्यक्तीला युनिव्हर्सिटीत  कुलगुरू होता येणार आहे. शिवाय कुलगुरू पदासाठी आता नॉन अकॅडमिक क्षेत्रातील व्यक्ती देखील पात्र ठरणार आहेत. या आधी कुलगुरू होण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकी सह मोठे शैक्षणिक करीयर असणे गरजेचे होते. नवीन नियमांनुसार इंडस्ट्री, पब्लिक पॉलिसी, पब्लिक सेक्टर, पीएसयू आदी क्षेत्रातील तज्ज्ञ देखील कुलगुरु होऊ शकणार आहेत. आधी कुलुगुरु पदासाठी ॲकेडमिक करीयर असणे अनिर्वाय होते.

हे देखील होणार प्र-कुलगुरु

नव्या ड्राफ्ट मार्गदर्शक नियमानुसार कोणत्याही उच्च शिक्षण संस्थांमध्ये दहा वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीदेखील युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर ( कुलगुरु ) बनू शकणार आहेत. या शिवाय उच्च शिक्षणात प्राध्यापक, रिसर्च सेक्टरमध्ये ॲकॅडमिक प्रशासनाचा अनुभव असणारे देखील कुलगुरू बनू शकणार आहेत. तसेच कुलगुरू पदासाटी एक व्यक्ती दोन वर्षांच्या कार्यकालासाठी नेमला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

नेट-पीएचडी शिवाय देखील प्राध्यापक बनता येणार

उच्च शिक्षण संस्थांमध्ये आणि महाविद्यालयात नेट आणि पीएचडी डिग्री नसलेले देखील आता प्रोफेसर बनू शकणार आहेत. असे उमेदवार युजीसीच्या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस योजनेंतर्गत आपली सेवा देऊ शकणार आहे. विविध उद्योग क्षेत्रातील विशेषतज्ज्ञ या योजनेंतर्गत महाविद्यालयात तीन वर्षांपर्यंत प्राध्यापक म्हणून काम करु शकणार आहे.ही पद अस्थायी असणार आहे. एकूण पदांमध्ये १० टक्के पदांसाठी अशा प्रोफेसरची नियुक्ती केली जाणार आहे.

हे लोक थेट प्राध्यापक बनणार

युजीसीने योग, संगीत, शिल्पकलेस एकूण ८ क्षेत्रातील विशेषतज्ज्ञांना असिस्टंट प्रोफेसर, एसोशिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदासाठी थेट नियुक्त केले जाणार आहे. यासाठी असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी कँडिडेट जवळ ग्रॅज्युएशनच्या डिग्रीसह संबंधिक क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव आणि राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार असणे गरजेचे आहे. तर असोशिएट प्रोफेसर पदासाठी उमेदवाराकडे युजीची पदवीसह दहा वर्षांचा अनुभव आणि प्रोफेसर पदासाठी युजी सह १५ वर्षांचा संबंधित क्षेत्राच अनुभव गरजेचा असणार आहे.